25 C
Mumbai
Tuesday, January 14, 2025
घरअर्थजगतदोन दशकांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ येणार

दोन दशकांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ येणार

गुंतवणूकदारांना दिवाळीनिमित्त खुशखबर

Google News Follow

Related

गुंतवणूकदारांना दिवाळीनिमित्त मोठी भेट मिळाली आहे. तब्बल दोन दशकांनंतर टाटा समूहाच्या कंपनीचा आयपीओ उघडणार आहे. २२ नोव्हेंबर २०२३ रोजी हा आयपीओ रिटेल गुंतवणूकदारांसाठी उघडणार आहे. तर, आयपीओ २४ नोव्हेंबर २०२३ पर्यंत गुंतवणूकदारांसाठी खुला राहणार आहे.

टाटा टेक्नोलॉजीजचा आयपीओ संपूर्ण ऑफर फॉर सेलवर आधारित असणार आहे. कंपनीचे प्रवर्तक आयपीओद्वारे त्यांचे स्टेक कमी करणार आहेत. या आयपीओद्वारे टाटा टेक्नॉलॉजीजचे एकूण ६.०८ कोटी रुपयांचे शेअर्स विकले जातील. यापूर्वी टाटा टेक्नॉलॉजीजने आयपीओद्वारे ९.५७ कोटी रुपयांची विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. या आयपीओ मध्ये टाटा मोटर्स ४.६२ कोटी शेअर्स, अल्फा टीसी ९७.१ लाख शेअर्स आणि टाटा कॅपिटल ग्रोथ फंड ४८ लाख शेअर्स विकणार आहे.

टाटा समूहाचा शेवटचा आयपीओ यापूर्वी १९ वर्षांपूर्वी २००४ मध्ये आला होता. त्यानंतर समूहाची आयटी कंपनी टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेसने (टीसीएस) आयपीओद्वारे देशांतर्गत बाजारपेठेत प्रवेश केला. टाटा टेक्नॉलॉजीज ही टाटा मोटर्सची उपकंपनी आहे, जी अभियांत्रिकी सेवा पुरवते.

JM Financial, Citi Group, Global Markets India, BofA Securities India यांना आयपीओसाठी लीड मॅनेजर नियुक्त केले आहेत. कंपनीने लिंक इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेडची रजिस्ट्रार म्हणून नियुक्ती केली आहे. दरम्यान, टाटा टेक्नॉलॉजीजच्या शेअर्सवर ग्रे मार्केट तेजीत आहे. ग्रे मार्केटमध्ये टाटा टेक्नॉलॉजीजचे शेअर्स २७५ रुपयांच्या प्रीमियमवर आहेत.

हे ही वाचा:

फेसबुकवरील ऑनलाईन कर्जाच्या ऑफरमुळे एकाला ९० हजारांचा फटका

५.२ रिश्टर स्केलच्या भूकंपाच्या धक्क्याने पाकिस्तान हादरले

सुब्रत रॉय यांनी दोन हजार रुपयांत गोरखपूरमधून व्यवसायाची सुरुवात

टिटवाळा रेल्वे स्थानक परिसरात एका महिलेवर बलात्कार!

टाटा टेक्नॉलॉजीजच्या आयपीओमध्ये टाटा मोटर्स लिमिटेडच्या भागधारकांसाठी १० टक्के इक्विटी शेअर्स राखीव ठेवता येतात. त्यामुळे ज्यांच्याकडे टाटा मोटर्सचे शेअर्स आहेत त्यांना आयपीओमध्ये शेअर्स सहज मिळू शकतात. याशिवाय या आयपीओमधील काही हिस्सा कंपनीच्या कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवला जाऊ शकतो. नियमानुसार, पोस्ट ऑफर इक्विटी शेअर्सपैकी ०.५० टक्के पर्यंत कर्मचाऱ्यांसाठी राखीव ठेवता येतात.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
221,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा