राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येत २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होणार

हॉस्पिटलॅटी, ट्रॅव्हल आणि टूरिजम सेक्टरला बूस्ट

राम मंदिर निर्माणानंतर अयोध्येत २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होणार

People light lamps on the banks of the river Saryu in Ayodhya, India, Sunday, Oct. 23, 2022. Over 15,00,000 earthen lamps were lit along the banks of the Saryu River, as millions of people across Asia celebrate Diwali, the Hindu festival of lights. (AP Photo/Rajesh Kumar Singh)

अयोध्येत राम मंदिर प्राण प्रतिष्ठेची तयारी जोरात सुरु आहे. सोहळ्यासाठी आणि नंतरही मोठ्या संख्येने भाविक अयोध्येत दाखल होणार असल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. त्यामुळे भाविकांच्या वाढत्या संख्येमुळे अयोध्येत पर्यटन क्षेत्राला जबरदस्त फायदा होणार असल्याचे बोलले जात आहे. विशेषतः हॉस्पिटलॅटी, ट्रॅव्हल आणि टूरिजम सेक्टरला राम मंदिर निर्माणामुळे खूप बूस्ट मिळणार आहे.

२२ जानेवारीला राम मंदिराचे उद्घाटन झाल्यानंतर २३ जानेवारीपासून राम मंदिर भाविकांसाठी खुले असणार आहे. त्यामुळे अयोध्येत दररोज येणाऱ्या भक्तांची संख्या लाखोंच्या घरात जाईल असा अंदाज आहे. भक्तांची संख्या वाढल्यानंतर त्यांच्या मागण्या पूर्ण करण्यासाठी टुरिझम इंडस्ट्रीमध्ये जवळपास २० हजारपेक्षा जास्त नोकऱ्यांची निर्मिती होईल असा अंदाज आहे. येणाऱ्या दिवसांमध्ये नोकऱ्या वाढतील अशी कंपन्यांना अपेक्षा आहे. पुढची २० ते ३० वर्ष अयोध्येला श्रीरामाच्या दर्शनासाठी जाणाऱ्या लोकांची संख्या वाढतच जाणार आहे.

रेडस्टँड इंडियामध्ये स्टाफिंग आणि रेडस्टँड टेक्नोलॉजीजे चीफ कमर्शियल ऑफिसर यशब गिरी यांनी सांगितलं की, “अयोध्येत पुढची काहीवर्ष दररोज ३ ते ४ लाख भाविक येतील आणि हे शहर एक ग्लोबल टूरिजम सेंटरमध्ये बदलणार आहे. या भागात निवासी व्यवस्था आणि ट्रॅव्हलच्या मागणीत वाढ झाली आहे. अयोध्येच्या हॉस्पिटॅलिटी सेक्टरमध्ये वाढ नोंदवण्यात आली आहे. भाविकांसाठी पायभूत सुविधांच्या निर्मितीवर भर देण्यात येईल. रेडस्टँडला अपेक्षा आहे की, दरवर्षी पर्यटकांची संख्या वाढण्याबरोबरच २० हजार ते २५ हजार कायमस्वरुपी आणि तात्पुरते जॉब्स तयार होतील. हॉटेल स्टाफ, हाऊसकिपिंग, फ्रंट-डेस्क मॅनेजर, शेफ आणि टूर गाइड या क्षेत्रात नोकऱ्या वाढतील.”

“मागच्या सहा महिन्यात हॉस्पिटॅलिटी, ट्रॅव्हल आणि टूरिज्मशी संबंधित कमीत कमी १० हजार नोकऱ्या निर्माण झाल्या आहेत,” असं टीमलीजचे कंज्यूमर एवं ईकॉमर्स वाइस प्रेसीडेंट आणि हेड बालासुब्रमण्यम ए यांनी सांगितेल. यात हॉटल कर्मचारी, शेफ, सर्वर्स, ड्राइव्हरचा समावेश आहे.

हे ही वाचा:

इराणची पाकिस्तानमध्ये घुसून कारवाई; दहशतवादी ठिकाणे उद्ध्वस्त

माजी सैनिकाची अनोखी रामभक्ती; ७ कोटी वेळा लिहिले ‘श्री राम’

विराट कोहलीला राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लेपाक्षीच्या वीरभद्र मंदिराला दिली भेट

हॉस्पिटॅलिटी सेक्टरच्या अधिकाऱ्यांनुसार हॉस्पिटॅलिटी मॅनेजर्स, रेस्टॉरंट आणि हॉटल कर्मचारी, लॉजिस्टिक्स मॅनेजर्स, ड्राइवर्स आदी क्षेत्रात नोकऱ्या या वर्षाच्या अखेरीस किंवा २०१५ च्या पहिल्या सहा महिन्यात निर्माण होण्याची शक्यता आहे. फक्त अयोध्येतच नाही तर लखनऊ, कानपूर, गोरखपूरमध्ये मागणी आणि पुरवठा याची काय स्थिती असेल, यावर हॉटेल कंपन्या आणि रेस्टॉरंट मालकांची नजर असेल.

Exit mobile version