गौतम अदानींचा ‘एनडीटीव्ही’त मोठा हिस्सा

एनडीटीव्ही मध्ये ५५ टक्के भागीदारी झाल्यावर अदानी समूह या मीडिया कंपनीतील प्रमुख भागधारक बनेल.

गौतम अदानींचा ‘एनडीटीव्ही’त मोठा हिस्सा

गौतम अदानी समूहाची कंपनी एएमजी मीडिया नेटवर्क लिमिटेडने मीडिया हाऊस एनडीटीव्हीमधील हिस्सा खरेदी करण्याची घोषणा केली आहे. अदानी समूह एनडीटीव्ही नवी दिल्ली टेलिव्हिजन लिमिटेड मधील २९.१८ टक्के स्टेक घेणार आहे. त्याचवेळी अदानी समूह ओपन ऑफरद्वारे एनडीटीव्ही मधील २६ टक्के स्टेक घेणार असून अदानी समूहाची एकूण भागीदारी ५५ टक्क्यांहून अधिक होईल.

एनडीटीव्ही मध्ये ५५ टक्के भागीदारी झाल्यावर अदानी समूह या मीडिया कंपनीतील प्रमुख भागधारक बनेल. सुमारे ४९५ कोटी रुपयांना हा करार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. अदानी समूहाने घोषणा केल्यानंतर एनडीटीव्हीचे शेअर्स आज पाच टक्क्यांनी वाढून ३७६.५५ रुपयांवर बंद झाले.

एमएमजी मीडिया नेटवर्कचे सीईओ यांनी एका निवेदनात म्हटले आहे की, मीडिया उद्योगाच्या पुढे जाण्यासाठी हे यश आमच्यासाठी महत्वाचे आहे. आम्ही भारतीय नागरिकांना, ग्राहकांना किंवा भारतात स्वारस्य असलेल्यांना माहिती आणि ज्ञान प्रदान करतो. आमचे लक्ष्य पूर्ण करण्यासाठी एनडीटीव्ही हे सर्वात योग्य प्रसारण आणि डिजिटल प्लॅटफॉर्म आहे. बातम्या वितरणात एनडीटीव्हीचे नेतृत्व अधिक मजबूत करण्यासाठी आम्ही उत्सुक आहोत.

हे ही वाचा:

मुंबईतल्या ललित हॉटेलमध्ये बॉम्ब ठेवल्याची धमकी

विधानभवनाजवळ शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

भाजपा नेत्या सोनाली फोगाट यांचे ४१ व्या वर्षी निधन

जागतिक वडापाव दिन: मुंबईची ओळख असणाऱ्या वडापावचा जन्म कसा झाला झाला?

एनडीटीव्ही हे एक आघाडीचे मीडिया हाउस आहे. मीडिया उद्योगात जवळपास तीन दशकांपासून ठसा उमटवलेल्या, या कंपनीकडे तीन राष्ट्रीय वृत्तवाहिन्या आहेत. एनडीटीव्ही २४/७, एनडीटीव्ही इंडिया आणि एनडीटीव्ही प्रॉफिट या तीन वृत्तवाहिन्या आहेत. सोशल मीडियाच्या वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर त्याची खूप फॅन फॉलोअर्स आहे. मार्च महिन्यात अदानी समूहाने स्थानिक डिजिटल बिझनेस न्यूज प्लॅटफॉर्म क्विंटिलियनमध्येही हिस्सा घेतला होता.

Exit mobile version