व्हिएतनाममध्ये अदानी कंपनी करणार गुंतवणूक

सीईओ करण अदानी यांनी दिली माहिती

व्हिएतनाममध्ये अदानी कंपनी करणार गुंतवणूक

गौतम अदानी यांचा उद्योग समूह व्हिएतनाम येथे बंदरे आणि अक्षय्य ऊर्जा प्रकल्पात तीन अब्ज डॉलरची गुंतवणूक करण्याचा विचार करतो आहे. व्हिएतनाम सरकारने एका निवेदनात ही माहिती दिली.

या संदर्भात नुकतीच अदानी पोर्ट्सचे सीईओ करण अदानी आणि व्हिएतनामचे पंतप्रधान फाम मिन्ह चिह यांची भेट झाली. या भेटीनंतर फाम चिह यांनीही अदानी यांच्या गुंतवणुकीचे संकेत दिले.

मोठ्या भारतीय कंपन्यांसाठी व्हिएतनाम सरकारची अनुकूल परिस्थिती निर्माण करण्याची तयारी आहे, असे अदानी पोर्ट्सचे सीईओ करण अदानी यांनी सांगितले. व्हिएतनामच्या पंतप्रधानांनी अदानी समूहाचे स्वागत केले आहे. अदानी समूह व्हिएतनाममध्ये मोठ्या कालावधीसाठी तब्बल १० अब्ज डॉलरपर्यंत गुंतवणूक करेल, असे मानले जात आहे.

हे ही वाचा:

बिजू जनता दलाचे ठरले! संसद भवन कार्यक्रमाला उपस्थित राहणार

संसद भवनाला विरोध करणारे उद्घाटनाच्या गोष्टी करताहेत!

कोकणातील गाड्यांचे आरक्षण एका मिनिटात कसे फुल होते?

बेशिस्तीच्या कारणास्तव काँग्रेसमधून आशीष देशमुखांची हकालपट्टी

 

शेअर मात्र घसरले

या दरम्यान बुधवारी अदानी ग्रुपची कंपनी अदानी पोर्ट्सचा शेअर २.१३ टक्क्यांनी घसरला. ग्रुपच्या सात कंपन्यांचा शेअर बुधवारी नुकसान सोसून बंद झाला. त्यामध्ये अदानी एंटरप्रायझेसचा शेअर सुमारे ६ टक्क्यांनी घसरला. तर, अदानी विल्मरचा शेअर ४.९९ टक्के, एसीसीचा शेअर २.१५ टक्के, अदानी पॉवरचा शेअर १.६३ टक्के, अंबुजा सिमेंटचा शेअर १.२५ टक्के आणि अदानी ग्रीन एनर्जीचा शेअर ०.५२ टक्क्यांनी घसरला. अर्थात अदानी ट्रान्समिशनच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांनी, अदानी टोटल गॅसच्या शेअरमध्ये पाच टक्क्यांनी आणि एनडीटीव्हीच्या शेअरमध्ये ४.९८ टक्क्यांनी वाढ झाली.

सर्वोच्च न्यायालयाच्या समितीने अदानी ग्रुपच्या बाजूने अहवाल सादर केल्यावर गेल्या तीन दिवसांपासून अदानी कंपन्यांचे शेअर नफ्यात होते.

Exit mobile version