अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी यांच्यावर कथित अब्जावधी डॉलर्सची लाच दिल्याचा आरोप अमेरिकेत ठेवण्यात आला आहे. यानंतर देशासह अर्थ जगतात मोठ्या हालचाली दिसून येत आहेत. गौतम अदानी आणि त्यांच्या सहयोगींवर २६५ दशलक्ष डॉलर्सच्या लाचखोरीचे गंभीर आरोप करण्यात आले आहेत. गौतम अदानी यांच्यावर करण्यात आलेल्या लाचखोरीच्या आरोपानंतर गुरुवारी भारतीय शेअर बाजारात देखील त्याचे परिणाम पाहायला मिळाले. अदानी समूहाच्या शेअर्समध्ये साधारण २० टक्क्यांची घसरण दिसून आली. अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स १५ टक्क्यांनी घसरले. अदानी पोर्ट आणि सेझ, अदानी पॉवर आणि एनर्जी आणि ग्रीन एनर्जीशी संबंधित शेअर्समध्येही मोठी घसरण दिसून आली.
अमेरिकेच्या जिल्हा न्यायालय आणि सेक्युरिटीज ऍण्ड एक्स्चेंज कमिशनने गौतम अदानी आणि अन्य अधिकाऱ्यांवर लाचखोरी आणि फसवणुकीचे गंभीर आरोप केले आहेत. या आरोपानंतर भारतीय शेअर बाजारात अदानी उद्योग समूहाच्या मालकीच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स गडगडले आहेत. अदानी उद्योग समूहाच्या सर्वच कंपन्यांचे शेअर्स साधार २० टक्क्यांनी घसरले आहेत. दरम्यान, अदानी शेअर्सच्या विक्रीमुळे अदानी समूहाचे मार्केट कॅप सुमारे २.४५ लाख कोटी रुपयांनी घसरले आहे. म्हणजेच गुरुवारी बाजार उघडल्यानंतर दोन तासांतच कंपनीचे अडीच लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले.
हे ही वाचा:
अमेरिकेतील लाचखोरीच्या आरोपांनंतर अदानी समूहाकडून ६० कोटी डॉलर्सचे करार रद्द
निज्जरच्या हत्येची कल्पना पंतप्रधान मोदींना असल्याचा आरोप हास्यास्पद
जम्मू- काश्मीरमध्ये घुसखोरी प्रकरणी एनआयएकडून आठ ठिकाणी छापेमारी
युपीआयचा वापर, कृषी, औषध निर्मितीसह भारत- गयाना यांच्यात १० सामंजस्य करार
अदानी समूहाची प्रमुख कंपनी असलेल्या अदानी एंटरप्रायझेसचे शेअर्स २२.९९ टक्के, अदानी पोर्ट्स २० टक्के, अदानी एनर्जी सोल्यूशन्स २० टक्के, अदानी ग्रीन एनर्जी १९.५३ टक्के आणि अदानी टोटल गॅस १८.१४ टक्क्यांनी घसरले. अदानी पॉवरचे शेअर्स १७.७९ टक्के, अंबुजा सिमेंट्स १७.५९ टक्के, ACC १४.५४ टक्के, NDTV १४.३७ टक्के आणि अदानी विल्मर १० टक्क्यांनी घसरले आहेत.