अदानी उद्योगसमुहाने बहुचर्चित एफपीओ घेतला मागे, भागधारकांचे पैसे करणार परत

अदानी उद्योगसमुहाने जारी केले निवेदन आणि भागधारकांवर व्यक्त केला विश्वास

अदानी उद्योगसमुहाने बहुचर्चित एफपीओ घेतला मागे, भागधारकांचे पैसे करणार परत

तब्बल २० हजार कोटींच्या गुंतवणुकीसाठी सुरू करण्यात आलेल्या अदानी एन्टरप्रायझेसच्या एफपीओला अदानी उद्योगसमुहाने मागे घेतले असून त्यात ज्या गुंतवणूकदारांनी पैसे गुंतविले आहेत, त्यांचे पैसे परत केले जातील असेही उद्योगसमुहाने स्पष्ट केले आहे.

गौतम अदानी यांनी यासंदर्भात आपल्या बोर्ड संचालकांशी चर्चा करून निवेदन सादर केले की, बुधवारी शेअर मार्केटमध्ये खूपच चढउतार होते, त्यामुळे आमच्या या एफपीओचे भावही सातत्याने वरखाली होत होते. त्यामुळे या शेअर्ससह पुढे वाटचाल करणे नैतिकदृष्ट्या योग्य नाही, असे कंपनीला वाटते. शेवटी भागधारकांचे हित हे सर्वोपरी आहे. त्यांना कोणत्याही प्रकारचे आर्थिक नुकसान होऊ नये, यासाठी बोर्डाने हा एफपीओ मागे घेण्याचे ठरविले आहे.

हे ही वाचा:

आरोग्य सुधारणार ..या आजारांचे होणार समूळ उच्चाटन

एकेकाळचे कट्टर वैरी बनले अदाणींचे तारणहार…

जाणून घ्या.. हे झाले स्वस्त, हे झाले महाग

आधार नाही आता पॅनकार्ड हेच ओळखपत्र

बोर्डाने सर्व भागधारकांचे आभार मानले असून त्यांनी अदानी उद्योगसमुहावर जो विश्वास दाखविला त्याबद्दल त्यांचे आभारी आहोत. धन्यवाद!

आता ज्या गुंतवणूकदारांनी आमच्या या एफपीओमध्ये पैसा गुंतविला आहे त्यांना तो परत केला जाईल.

अदानी एन्टरप्रायझेसला २६ टक्के नुकसान झाले अशून त्यामुळे शेअरचा भाव २१८०.२० पर्यंत खाली आला. अदानी पोर्ट्सलाही मोठा फटका बसला असून त्याचा भाव २० टक्के घसरला आहे आणि तो ४९२.१५वर आला आहे. अदानीने घेतलेल्या अंबुजा सीमेंट आणि एसीसी यांच्या शेअर्समध्येही घसरण पाहायला मिळाली. अंबुजाचे शेअर्स १६.५६ टक्के घसरले तर एसीसीचे ५.९६ टक्के.

अदानी उद्योगसमुहाने म्हटले आहे की, या निर्णयामुळे अदानी एन्टरप्रायझेसच्या नियमित कामकाजावर कोणताही परिणाम होणार नाही. आमचा ताळेबंद अगदी भक्कम आहे. त्यामुळे आमच्या भविष्यातील योजनांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही. एकदा का बाजार स्थिरस्थावर झाला की, आम्ही आमच्या भांडवली बाजाराच्या डावपेचांचा पुन्हा आढावा घेऊ. आम्हाला आमच्या भागधारकांचा असाच पाठिंबा मिळत राहील असा विश्वास आहे. धन्यवाद.

Exit mobile version