अर्थसंकल्पात मोठी घोषणा; आशा, अंगणवाडी सेविकांना ‘आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार

आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा

अर्थसंकल्पात मोठी घोषणा; आशा, अंगणवाडी सेविकांना ‘आयुष्मान भारत’चा लाभ मिळणार

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण या संसदेत अंतरिम अर्थसंकल्प सादर करत असून गरीब, महिला, तरुण आणि शेतकरी वर्गावर विशेष लक्ष असल्याचे त्या म्हणाल्या. या चार वर्गांच्या गरजा, महत्त्वाकांक्षा आणि विकास या गोष्टी आमच्या प्राधान्याक्रमावर आहेत. देशाचा विकास त्यांच्या विकासात दडलेला आहे, असंही त्या म्हणाल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही यापूर्वी अनेकदा नारीशक्तीचा गौरव केला होता. त्यामुळे या अर्थसंकल्पात महिलांसाठी दिलासा देणाऱ्या बाबी असतील असा अंदाज व्यक्त केला जात होता. अशातच अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे.

आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांसाठी अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी अर्थसंकल्पात मोठी घोषणा केली आहे. देशभरातील सर्व आशा आणि अंगणवाडी सेविकांना आता ‘आयुष्मान भारत योजने’चा लाभ मिळणार आहे. अंतरिम बजेट सादर करताना अर्थमंत्री निर्मला सितारामण यांनी अनेक घोषणा केल्या. यामुळे आशा वर्कर आणि अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा मिळाला आहे. याशिवाय महिला, तरुण आणि शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यात आले आहेत.

हे ही वाचा:

“गरीब, महिला, युवा, अन्नदाता यांच्यावर लक्ष केंद्रीत”

“सर्वांचा पाठिंबा, विश्वास, प्रयत्न या मंत्रानेचं पुढे जातोय”

इम्तियाज जलील यांच्यासह ५०० आंदोलकांवर गुन्हा दाखल

१६४ वर्षांपूर्वी भारतात मांडला गेलेला पहिला अर्थसंकल्प! जाणून घ्या अर्थसंकल्पाचा रंजक इतिहास

गेल्या १० वर्षांत मोदी सरकारच्या प्रगतीचा आलेखही निर्मला सीतारमण यांनी वाचून दाखविला. तसेच त्यांनी महिलांबाबत केलेल्या कामांचीही गणती दिली. सीतारमण म्हणाल्या की, “गेल्या दहा वर्षात उच्च शिक्षणात महिलांचं प्रमाण २८ टक्क्यांनी वाढलं आहे. STEM कोर्सेसमध्ये मुली, महिला यांची ४३ टक्के नोंदणी झाली आहे. या सर्व गोष्टींमुळं वर्कफोर्समध्ये महिलांचा सहभाग वाढला आहे. त्याचबरोबर महिला सक्षमीकरणासाठी तिहेरी तलाक बेकायदा ठरवला, संसदेत आणि राज्यांच्या विधीमंडळांमध्ये एक तृतीयांश महिलांसाठी आरक्षण लागू केलं. पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून महिलांसाठी ७० टक्के घरांची निर्मिती झाल्यानं महिलांचा आत्मसन्मान वाढला आहे, असं निर्मला सीतारमण म्हणाल्या.

Exit mobile version