श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात २५ हजार कोटींच्या उलाढालीचे थर

कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने दिली आकडेवारी

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात २५ हजार कोटींच्या उलाढालीचे थर

देशभरात सध्या सणांचे दिवस असून याचा सकारात्मक परिणाम बाजारपेठेवर आणि अर्थव्यवस्थेवर दिसून येत आहेत. राज्यासह देशभरात श्रीकृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्सहात साजरी झाली. यानिमित्त देशभरात कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याची माहिती समोर आली आहे. ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने (CAIT) या संदर्भात वृत्त दिले आहे.

श्रीकृष्ण जन्माष्टमीनिमित्त देशभरात २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली, अशी ‘कन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स’ने माहिती दिली आहे. श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्त व्यावसायिकदृष्ट्या मोठी उलाढाल झाली आहे. शिवाय यंदा झालेली उलाढाल ही देशभरातील ग्राहकांची मजबूत क्रयशक्‍तीवर दर्शवते, असेही ‘सीएआयटी’ने नमूद केले आहे.

कृष्ण जन्माष्टमी मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात देशभरात साजरी करण्यात आली. विविध सामाजिक संस्थांनीही मोठ्या प्रमाणावर जन्माष्टमी साजरी केली. ‘सीएआयटी’चे राष्ट्रीय सरचिटणीस आणि खासदार प्रवीण खंडेलवाल यांनी सांगितले की, जन्माष्टमीसारखे सण हे आपल्‍या अर्थव्यवस्थेचा एक महत्त्वाचा आहेत. हे सण देशाची अर्थव्यवस्था मजबूत करतात. सणांच्या काळात फुले, फळे, मिठाई, देवांच्या वेशभूषा, सजावटीच्या वस्तू, उपवासाच्या मिठाई, सुका मेवा, दूध, दही आदी वस्तूंची मोठ्या प्रमाणावर विक्री केली जाते. याप्रमाणेचं या जन्माष्टमीलाही या वस्तूंची ग्राहकांनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली. त्यामुळे देशभरात २५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली.

सीएआयटीचे राष्ट्रीय अध्यक्ष भरतिया यांनी सांगितले की, “देशभरात विशेषतः उत्तर आणि पश्चिम भारतात जन्माष्टमी मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. मंदिरे आकर्षकपणे सजवण्यात आली होती तसेच बाजारात ग्राहकांची गर्दी लक्षणीय होती. शहरांमध्येही संत-मुनींची असंख्य भजने, धार्मिक नृत्ये आणि प्रवचने आयोजित करण्यात आली होती. विविध सामाजिक संस्थांनीही मोठ्या प्रमाणात जन्माष्टमी साजरी केली.”

हे ही वाचा :

भाजपमध्ये प्रवेश करणार चंपाई सोरेन, दिल्लीमध्ये अमित शहांची घेतली भेट !

बांगलादेशमधील हिंदूंच्या सुरक्षेबाबत पंतप्रधान मोदींची अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांशी फोनवरून चर्चा

महिला टी-२० विश्वचषक स्पर्धेत ६ ऑक्टोबरला भारत-पाकिस्तान आमनेसामने

बलुच बंडखोरांनी केलेल्या विविध हल्ल्यांमध्ये पाकिस्तानच्या लष्करी जवानांसह ७३ जणांचा मृत्यू

या महिन्याच्या सुरुवातीला, सीएआयटीने राखीच्या सणाच्या वेळी देशभरात सणासुदीच्या व्यापाराचा अंदाज १२ हजार कोटी रुपयांपेक्षा अधिक होता. खंडेलवाल यांनी दिलेल्‍या माहितीनुसार, राखी सणाचा व्यवसाय २०२२ मध्ये सुमारे ७ हजार कोटी रुपये, २०२१ मध्‍ये ६ हजार कोटी रुपये, २०२० मध्ये ५ हजार कोटी रुपयांची उलाढाल झाली होती.

Exit mobile version