अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे

५० ग्रॅम वजनाचे शुद्ध चांदीचे नाणे

अयोध्या राम मंदिराच्या पार्श्वभूमीवर अर्थ मंत्रालयाने जारी केले चांदीचे नाणे

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी गुरुवार, १५ फेब्रुवारी रोजी तीन स्मरणिका नाणी जारी केली आहेत. यामध्ये एक नाणे हे प्रभू श्री राम आणि रामजन्मभूमी मंदिर, अयोध्या या विषयावर आधारित आहे. याशिवाय, त्यांनी भगवान बुद्धांच्या ज्ञानप्राप्तीवर आधारित दोन धातूंचे मर्यादित आवृत्तीचे नाणे आणि एक शिंगे असलेल्या गेंड्यावर आधारित नाणे (भारतातील संकटग्रस्त प्राण्यांच्या मालिकेतील भाग) देखील जारी केले आहेत.

सरकारी मालकीच्या सिक्युरिटी प्रिंटिंग अँड मिंटिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या (SPMCIL) १९ व्या पायाभरणी समारंभात अर्थमंत्र्यांनी ही नाणी जारी केली. राम मंदिर संबंधित हे नाणे ५० ग्रॅम वजनाचे असून शुद्ध चांदीचे आहे. याची किंमत ५ हजार रुपयांपेक्षा जास्त आहे.

हे ही वाचा:

लंडनच्या आर्टिफिशिअल इंटेलिजन्स सेंटरला छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव

मणिपूरमध्ये पुन्हा संघर्ष; गाड्या पेटवल्या, एकाचा मृत्यू!

‘सूर्यकुमार यादवमुळे मुलाचे पदार्पण पाहू शकलो’

‘ती माझी चूक होती’

भगवान बुद्धांचे हे २४ ग्रॅमचे द्विधातूचे नाणे तांबे आणि स्टेनलेस स्टीलचे आहे. तीन मिमी जाड आणि ३५ मिमी घेर असलेल्या या नाण्याची किंमत ३ हजर ६५७ आहे. याशिवाय भारतातील धोक्यात असलेल्या प्राण्यांच्या श्रेणीत मोठ्या एक शिंगे असलेल्या गेंडयाला स्थान देण्यात आले आहे. याबाबत जारी करण्यात आलेले नाणे ३२ ग्रॅम वजनाचे तांबे, जस्त आणि निकेलपासून तयार करण्यात आले आहे. ४४ मिमी घेर असलेल्या या नाण्याची किंमत १ हजार २८७ रुपये आहे. अर्थ मंत्रालयाने सांगितले की, ही सर्व स्मरणिका नाणी सरकारच्या अधिकृत वेबसाइटवरून खरेदी करता येणार आहेत.

Exit mobile version