देशात वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटी कलेक्शनने (GST Collection) सरकारच्या तिजोरीत चांगलीच भर पडली आहे. एप्रिल २०२३ मध्ये जीएसटी संकलन विक्रमी झाले आहे. एप्रिल महिन्यात आतापर्यंतचे सर्वाधिक महसूल संकलन झाले आहे.
एप्रिल महिन्यात १.८७ लाख कोटी रुपये इतके जीएसटी कलेक्शन झाले आहे. यामध्ये सीजीएसटी (CGST) ३८ हजार ४४० कोटी रुपये इतका आहे. एसजीएसटी (SGST) ४७ हजार ४१२ कोटी रुपये इतका आहे. आयजीएसटी (IGST) ३४ हजार ९७२ कोटी रुपये जमा केलेल्या उपकरांसह ८९ हजार १५८ कोटी रुपये इतका आहे आणि आयातीवरील कर १२,०२५ कोटी रुपये इतका आहे.
एप्रिल २०२३ च्या महसुलातील वाढ ही मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलापेक्षा १२ टक्के जास्त आहे. जीएसटी संकलनाने प्रथमच १.७५ लाख कोटींचा टप्पा ओलांडला आहे.
GST revenue collection for April 2023 highest ever at Rs 1.87 lakh crore: Ministry of Finance
— ANI (@ANI) May 1, 2023
हे ही वाचा:
सव्वा तीन लाख ‘मोदी मित्र’ मुस्लिमबहुल मतदारसंघात करणार प्रचार
सहा महिने वाट न पाहताही घटस्फोट दिला जाऊ शकतो
केंद्र सरकारचा डिजिटल स्ट्राईक , पकिस्तानशी संबंधित १४ मेसेंजर ऍपवर बंदी
‘महाविकास आघाडीला शरीया कायदा लागू करायचा आहे’
एप्रिल महिन्यात २० एप्रिल २०२३ रोजी एकाच दिवशी सर्वाधिक कर संकलन झाले. या दिवशी ९.८ लाख व्यवहारांद्वारे ६८ हजार २२८ कोटी रुपये भरले गेले. तर या दिवशी २०२२ रोजी ९.६ लाख व्यवहारांद्वारे सर्वाधिक एक दिवसाचे संकलन हे ५७ हजार ८४६ कोटी रुपये इतके होते. महाराष्ट्राच्या संकलनात २१ टक्क्यांनी वाढ झाली आहे.