नऊ वर्षाचा मुलगा जगातील सर्वात तरुण अब्जाधीश….

नऊ वर्षाचा मुलगा जगातील सर्वात तरुण अब्जाधीश….

सरासरी नऊ दहा वर्षे वय असणं म्हणजे हे शाळेत जाऊन शिकण्याचे, खेळण्याचे वय. मात्र अवघ्या नऊ वर्षाच्या वयात हा मोम्फा जुनिअर आफ्रिकन मुलगा अब्जाधीश झाला आहे. त्याला जगातील ‘ सर्वात तरुण अब्जाधीश ‘ असे टोपणनाव दिले आहे.

मोम्फा जुनिअर या नावाने त्याला सगळे ओळखतात. मात्र त्याचे नाव मोहम्मद अवलं मुस्तफा असे आहे. तो जगभर खासगी जेटने फिरतो एवढेच नव्हे तर त्याच्या नावावर आलिशान हवेल्या देखील आहेत. आफ्रिकेतील नायजेरिया येथे वयाच्या सहाव्या वर्षी तो एका हवेलीचा मालक बनला होता.

कोण आहे हा मोम्फा जुनिअर?

इस्मेलिया मुस्तफा म्हणजेच मोम्फा सिनियर याचा हा मुलगा आहे. मोम्फा सिनियर हे एक करोडपती सोशलमीडिया वापरकर्ता आहेत. त्यांचे एक दशलक्षाहून अधिक इंस्टाग्रामवर फॉलोवर्स आहेत. ते एक गुंतवणूकर आहेत तसेच ब्युरो डी चेंजचे ते सीईओ आहेत. त्याच्यावर दहा दशलक्ष पेक्षा जास्त लाँड्रिंगचे आरोप आहेत.  मोम्फा जुनिअर च्या नावावर जी काही संपत्ती आहे ती त्याच्या वडिलांनी त्याला भेट म्हणून दिली आहे.

हे ही वाचा:

ठाकरे सरकारला ‘सर्वोच्च’ दणका…भाजपाच्या १२ आमदारांचे निलंबन रद्द

चीनने अपहरण केलेला तरुण परतला भारतात

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय म्हणजे ठाकरे सरकारला थप्पड

महाभकास आघाडी सरकारच्या हुकूमशाही प्रवृत्तीचे थोबाड फोडणारा निर्णय

या सर्वात तरुण अब्जाधीशाकडे अनेक हवेल्या, स्वतःचे खासगी जेट तसेच त्याच्याकडे लॅम्बोर्गिनी, फेरारीसह अनेक  ग्लॅमरस स्पोर्ट्स कार आहेत. इंस्टाग्रामवर त्याचे २७ हजार फॉलोवर्स असून तो ‘ बेबी इन्फ्लुएन्सर ‘ आहे. तो सोशल मीडियावर नियमित सक्रिय असतो.

तो त्याच्या शैलीमध्ये प्रसिद्ध आहे. अनेकदा तो डोक्यापासून पायापर्यंत डिझायनर कपडे घालून सजलेला असतो. सर्व ब्रँडेड वस्तू कपडे घालूनच तो नेहमी सजलेला असतो. त्याच्या नावावर १५ दशलक्ष संपत्ती आहे

Exit mobile version