ऑगस्टमध्ये जीएसटी जमा होण्याचा नवा विक्रम

११ टक्क्यांची वाढ

ऑगस्टमध्ये जीएसटी जमा होण्याचा नवा विक्रम

ऑगस्ट २०२३ मध्ये एकूण जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर १ लाख ५९ हजार ६९ कोटी रुपये जमा झाला आहे. त्यात केंद्राचा वस्तू आणि सेवा कराचा वाटा २८ हजार ३२८ कोटी रुपये आहे. एसजीएसटी म्हणजेच राज्यांचा वस्तू आणि सेवा कराचा वाटा ३५ हजार ७९४ कोटी रुपये आहे. सेस कराच्या रुपाने ११ हजार ६९५ कोटी रुपयांचा महसूल जमा झाला आहे. महाराष्ट्रात ऑगस्टमध्ये २३ हजार २८२ कोटी रुपये जीएसटीच्या रूपाने प्राप्त झाले आहेत.

 

केंद्र सरकारने सीजीएसटी करातून मिळणारे ३७,५८१ कोटी रुपये आणि एसजीएसटी करातून मिळणारे ३१,४०८ कोटी रुपये आयजीएसटी कराच्या रूपाने चुकते केले आहेत. नियमित व्यवहारानंतर ऑगस्ट २०२३ या महिन्यात केंद्र आणि राज्यांचा एकूण जमा महसूल सीजीएसटी कराच्या रूपाने ६५ हजार ९०९ कोटी रुपये, तर एसजीएसटी कराच्या रूपाने ६७ हजार २०२ कोटी रुपये एवढा आहे. राज्यात या ऑगस्टमध्ये एसजीएसटी कराच्या रूपाने ७ हजार ६३० कोटी रुपये जमा झाले तर आयजीएसटी कराच्या रूपाने ३ हजार ८४१ कोटी रुपये चुकते करण्यात आले आहेत.

हेही वाचा..

लाठीचार्ज केला नसता तर पोलिसांची अवस्था वाईट झाली असती!

बेहिशेबी मालमत्ता बाळगल्याप्रकरणी वेस्टर्न कोलफिल्ड्स लिमिटेडचे दोन अधिकाऱ्यांसह एक दोषी

धक्कादायक! राजस्थानमध्ये विवाहितेची पती आणि सासरच्यांकडून नग्न धिंड

सुधीर मोरे आत्महत्या प्रकरणी माजी आमदारांच्या मुलीवर गुन्हा दाखल

ऑगस्टमध्ये महसूल मागील वर्षीच्या याच महिन्यातील जीएसटी महसुलाच्या तुलनेत ११ टक्क्यांनी जास्त आहे. या महिन्यात वस्तूंच्या आयातीतून मिळणारा महसूल ३ टक्क्यांनी जास्त होता आणि देशांतर्गत व्यवहारातून (सेवांच्या आयातीसह) मिळालेला महसूल गेल्या वर्षीच्या याच महिन्यात, त्याच स्रोतांमधून मिळालेल्या महसुलापेक्षा १४ टक्क्यांनी जास्त आहे.

Exit mobile version