रिझर्व्ह बँकेचा एटीएम बाबत मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेचा एटीएम बाबत मोठा निर्णय

रिझर्व्ह बँकेने खासगी बँकांसाठी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे बँकांना त्यांच्या एटीएममध्ये सतत रोख ठेवावी लागणार आहे. एटीएममध्ये कॅश नसणे बँकांना महागात पडणार आहे.

रिझर्व्ह बँकेने घेतलेल्या निर्णयानुसार १ ऑक्टोबर २०२१ पासून बँकांना एटीएममध्ये कॅश ठेवावी लागणार आहे. अन्यथा रिझर्व्ह बँक इतर बँकांना एटीएममध्ये रोख उपलब्ध नसल्यास मोठ्या प्रमाणात दंड करणार आहे.

हे ही वाचा:

सोन्याला ‘अच्छे दिन’ येणार

नियोजनशून्य कारभारामुळे लसीकरणाचे झाले ‘कल्याण’

मोदी सरकार रोज १०० किमी रस्ते बांधणार

प्रभू श्रीरामांना शिवीगाळ करणाऱ्या इम्तियाझ खान विरोधात तक्रार

रिझर्व्ह बँकेच्या नव्या निर्णयानुसार रिकाम्या एटीएमसाठी बँकांना दंड भरावा लागणार आहे. जर बँकेच्या एटीएममध्ये महिन्यात १० तासापेक्षा अधिक काळ रोख उपलब्ध नसेल तर अशा प्रत्येक घटनेसाठी १०,००० रुपयांचा दंड ठोठावणार आहे. ज्या एटीएमला व्हाईट एटीएमचा दर्जा दिलेला असेल अशा बँकांना दंड भरावा लागणार आहे. याबाबत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ट्वीट देखील केले आहे. यामध्ये देखील रिझर्व्ह बँकेने या निर्णयाची सखोल माहिती दिली आहे.

आरबीआयने असे देखील सांगितले आहे की, एटीएमच्या बंद असण्याच्या कालावधीबाबत बँकेनेच आरबीआयला अहवाल देणे आवश्यक आहे. हा अहवाल देखील यंत्रणेमार्फतच निर्माण करण्यात आलेला असणे आवश्यक आहे.

बँकांनी त्यांच्या एटीएममध्ये कॅश सातत्याने ठेवावी यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे रिझर्व्ह बँकेच्या पत्रकात म्हटले आहे.

Exit mobile version