एलआयसी आयपीओ शेअर्सवर उड्या!

एलआयसी आयपीओ शेअर्सवर उड्या!

देशातील आतापर्यंतच्या सर्वात मोठ्या एलआयसी आयपीओच्या समभागांची विक्री सुरु झाली आहे. पहिल्याच दिवशी गुंतवणूकदारांनी आणि पोलिसीधारकांनी या आयपीओला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. बुधवार, ४ मे रोजी आयपीओच्या पहिल्या दिवशी सायंकाळपर्यंत ६७ टक्के शेअर्ससाठी बाेली लावली गेली आहे.

पहिल्या दिवशी बोली लावणाऱ्यांत एलआयसी पोलिसीधारकांची संख्या जास्त होती. पोलिसीधारकांसाठी राखीव ठेवलेल्या असलेल्या समभागांसाठी १.१९ पट अधिक मागणी करण्यात आली आहे. म्हणजेच पोलीसीधारकांसाठी २.२१ कोटी समभाग राखीव होते. त्यातुलनेत पहिल्या दिवशी दुपटीहून अधिक समभागांसाठी नोंदणी करण्यात आली.

तर कर्मचाऱ्यांसाठी राखीव हिस्स्यात १. १७ अधिक नोंद झाली. कर्मचाऱ्यांसाठी १५.८१ टक्के समभाग राखीव ठेवण्यात आले आहेत. पहिल्या दिवशी १८.५३ लाख समभागांसाठी बोली नोंदवण्यात आली आहे. तर किरकोळ गुंतवणूकदारांनी ६० टक्के, नॉन इन्स्टिट्युशनल गुंतवणूकदारांनी २७ टक्के शेअर्ससाठी बोली सादर केल्या आहेत. सरकारला एलआयसीच्या आयपीओतून २१ हजार कोटी रुपये मिळण्याची अपेक्षा आहे. एलआयसीने ३.५ टक्के हिस्सेदारी आयपीओतून विकणार आहे. आयपीओसाठी प्राइझ बँड ९०२ ते ९४९ रुपये प्रतिशेअर निश्चित करण्यात आला आहे.

हे ही वाचा:

भीमा कोरेगाव प्रकरणात संभाजी भिडेंविरोधात पुरावे नाहीत

बँडस्टँड येथील मोक्याचा शासकीय भूखंड कवडीमोल किंमतीने बिल्डरच्या घशात

साईंची आरती भोंग्यावर होऊ दे, मुस्लिम समाजाची प्रशासनाला विनंती

या विषयांवर पंतप्रधान मोदींनी नॉर्डिक देशांशी केली चर्चा

एलआयसीचा आयपीओ हा भारतातील आजवरचा सर्वात मोठा आयपीओ ठरला आहे. यापूर्वी नोव्हेंबर २०२१ मध्ये पेटीएमचा सर्वात मोठा आयपीओ आला होता. त्याचे प्राइझ बँड २ हजार ८० ते २ हजार १५० होते. हा आयपीओ १८ हजार ३०० कोटी रुपयांचा होता. त्याची सदस्यता १.८९ पटीने झाली होती. मात्र, पेटीएमला एलआयसीने मागे टाकले आहे.

Exit mobile version