या तारखेपासून कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांची माहिती

या तारखेपासून कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य

कोणत्या तारखेपासून कारमध्ये सहा एअरबॅग अनिवार्य करण्यात येणार याची  माहिती केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी सोशल मीडियावर दिली आहे.

१ ऑक्टोबर २०२३ पासून प्रवासी कारमध्ये सहा एअरबॅग बंधनकारक असतील असे केंद्रीय मंत्र्यांनी म्हटलं आहे . ऑटो उद्योगाला भेडसावणाऱ्या जागतिक पुरवठ्यातील अडचणी आणि त्याचा आर्थिक परिस्थितीवर होणारा परिणाम लक्षात घेऊन प्रवासी कारमध्ये  १ ऑक्टोबर २०२३ पासून लागू होणार आहेत. किमान ६ एअरबॅग अनिवार्य करण्याच्या प्रस्तावाची अंमलबजावणी करण्याचा निर्णय घेण्यात आला असल्याचं नितीन गडकरी यांनी  ट्विट करून म्हटलं आहे .

 

भारतात सहा एअरबॅग अनिवार्य करण्याची घोषणा या वर्षी जानेवारीमध्ये करण्यात आली होती. परंतु  मुंबई-अहमदाबाद महामार्गावर सायरस मिस्त्री यांच्या अपघाती मृत्यूनंतर सीटबेल्ट वापरण्याच्या चर्चेला वेग आला. कारण मिस्त्री यांनी सीटबेल्ट लावला नव्हता असे दिसून आले होते.  त्यानंतर मॅक्सच्या सीटवर बसणाऱ्यांनाही सीटबेल्ट बंधनकारक करण्यात आले. मागच्या सीटवर लोक सीट बेल्ट लावत नसल्यामुळे महाराष्ट्र पोलिसांनी यापूर्वीच २०० चालकांना दंड ठोठावला आहे.

हे ही वाचा:

छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनल दिसणार नव्या रुपात

नवरात्र २०२२ : परशुराम माता, रेणुकादेवीची कथा

कोकण विभागाकडून ११४ शेतकऱ्यांना पर्यटन प्रमाणपत्र  

डीए वाढला; सरकारची केंद्रीय कर्मचाऱ्यांना भेट

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत गडकरी यांनी निर्यात होणाऱ्या  कारमध्ये  कंपन्या सहा एअरबॅग देतात, पण भारतासाठी उत्पादन होते तेव्हा  त्यात फक्त चार एअरबॅग दिल्या जातात. एक एअरबॅग बनवण्यासाठी फक्त नऊशे रुपये खर्च येतो. मोठ्या प्रमाणात उत्पादन झाल्यास एअरबॅगची किंमतही लक्षणीयरीत्या खाली येईल या कडे लक्ष वेधले होते .यापूर्वी काही कार निर्मात्यांनी सरकारच्या या निर्णयावर चिंता व्यक्त केली होती. या नियमामुळे गाड्यांच्या किमती वाढतील आणि त्याचा थेट परिणाम कारच्या विक्रीवर होण्याची भीती कंपन्यांना आहे.

Exit mobile version