देशात आर्थिक साक्षरतेचे प्रमाण वाढत असल्याने शेअर बाजाराकडेही लोकांचा कल वाढत चालला आहे. आशियातील पहिली आणि एकमेव सूचीबद्ध डिपॉझिटरी सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिसेस इंडियाने आर्थिक वर्ष २०२२-२३ वर्षातील सप्टेंबर तिमाहीची आकडेवारी जाहीर केली. या आकडेवारीनुसार, यावर्षी जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात देशात ४८ लाख डिमॅट खाती उघडण्यात आली आहेत. कोरोना महामारी संपून देशची आर्थिक घडी पुन्हा एकदा नीट बसू लागली असल्याचे हे द्योतक आहे.
देशातील शेअर बाजारात लोकांचा मोठ्या प्रमाणावर सहभाग असल्याचे जाहीर झालेल्या आकडेवारीवरून स्पष्ट होते. सीडीएसएलने यावर्षी ऑगस्टमध्ये ७ कोटी डिमॅट खाती उघडून एक ऐतिहासिक विक्रम नोंदवला होता .देशातील सर्वात मोठी डिपॉझिटरी संस्था नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेडच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याला संबोधित करताना केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन म्हणाल्या होत्या की, भारतीय किरकोळ गुंतवणूकदारांनी अर्थव्यवस्थेला चालना देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे, विशेषत: गेल्या दोन वर्षांत हे योगदान अभूतपूर्व आहे. माहिती देताना त्यांनी सांगितले होते की २०१९-२० मध्ये वर्षाला ४ लाख डिमॅट खाती उघडली जात होती तर २०२०-२१ या आर्थिक वर्षात दरमहा १२ लाख खाती उघडण्यात आली.
हे ही वाचा:
शिवसेनेचे माजी आमदार विनायक निम्हण यांचं निधन
आता केजरीवाल म्हणतात नोटेवर गांधीजींसोबत लक्ष्मी-गणेशाचे चित्र छापा
ऋषी सुनक यांच्या घरी आली लक्ष्मी; पत्नी अक्षता मूर्ती यांना मिळाला १२६ कोटींचा लाभांश
दरवर्षी आकडेवारी वाढत आहे
२०१८-१९ या आर्थिक वर्षात ३ लाख ५९ हजार डिमॅट खाती उघडण्यात आली. ही खाती २०१७-१८ या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ३९ टक्क्यांनी जास्त होती. त्याचप्रमाणे २०१९-२० या आर्थिक वर्षात ४ लाख ९ हजार डिमॅट खाती उघडण्यात आली. त्याआधीच्या वर्षाच्या तुलनेत त्यात ५० टक्क्यांची वाढ दर्शवते. २०२०-२१ आणि २०२१-२२ (ऑक्टोबर) या वर्षांची आकडेवारी पाहिली तर ती अनुक्रमे ५ लाख ५१ हजार आणि ७ लाख ३८ हजार खाती इतकी आहे.