अक्षय तृतियेचा मुहूर्त कोणत्याही कार्यासाठी शुभ मानला जातो. अशा परिस्थितीत वाहन, घर इत्यादी नवीन वस्तू खरेदी करायच्या असतील तर काम त्याच दिवशी करण्याची प्रथा आहे. याशिवाय दागिने खरेदी करणे देखील शुभ मानले जाते.
मुंबई मध्ये मागील वर्षीय अक्षय तृतीय दिवशी आणि इतर सणांत कार,वस्तू खरेदीची तुलना केली असता यावर्षी शुभदिनी नवीन कार खरेदी नोंदणीचे प्रमाण ४४% टक्क्यांनी वाढले आहे,अशी माहिती परिवहन विभागाकडून देण्यात आली.
हे ही वाचा:
खासदारकी रद्द झाल्यामुळे राहुल गांधींनी २० वर्षांनी सोडला बंगला
खारघर मध्ये उभारणार स्वयंचलित हवामान केंद्र !
अखेर ३६ दिवसांनी अमृतपाल पोलिसांच्या जाळ्यात
घरच्या मैदानात अजित पवारांनी केली मुख्यमंत्रीपदाची दावेदारी…
आलेल्या आकडयानुसार उत्सवादरम्यान नवीन कार नोंदणीत ३५ टक्क्यांनी वाढ झालेली असून,दुचाकी नोंदणीचे प्रमाणही ८ टक्क्यांनी वाढले आहे. ताडदेव आरटीओ येथे सर्वाधिक १९० कार आणि १८९ अंधेरी आरटीओमध्ये कार नोंदणी झाली, तर बोरिवली आरटीओमध्ये २७७ दुचाकींसह दुचाकींची सर्वाधिक नोंदणी झाली अशी माहिती आरटीओच्या सूत्रांकडून देण्यात आली.या वर्षी, शनिवारी सणासाठी एकूण ७२६ कार आणि १,०३० बाइक्स संपूर्ण बेट शहर आणि उपनगरातील शोरूममध्ये वितरित करण्यात आल्या, तर इतर नागरिकांनी देखील शुभ दिवशी सोने आणि चांदीची खरेदी केली आणि नवीन फ्लॅट बुक केले.
ऑटोमोबाइल उद्योजक तज्ञ म्हणतात, मागील काही महिन्यांमध्ये नवीन कर खरेदी आणि विक्रीचे प्रमाण कमी झाले होते. तसेच डीलर शोरूम मध्येही गर्दीचे प्रमाण कमी झाले होते.एका कार डीलरने सांगितले की, “परंतु सणासुदीच्या हंगामापासून विक्री परत होऊ लागली आहे आणि आम्हाला आशा आहे की, ती या आर्थिक वर्षापर्यंत सुरू राहील. नागरिकांनी नवीन इलेक्ट्रिक कार आणि स्कूटरचेही बुकिंग केले आहे. सुमारे १४ हजार ई-टू-व्हीलरची संख्या असून २२ हजारचा टप्पा ओलांडला आहे. सूत्रांनी सांगितले,मुंबई मध्ये नवीन कार खरेदी वर्षातील चार दिवस मोठ्या प्रमाणात केली जाते, गुढी पाडवा,दिवाळी,अक्षय तृतीया आणि दसरा यादिनी मोठ्या प्रमाणात खरेदी केली जाते.
त्यामुळे नवीन उपक्रम सुरू करण्यासाठी किंवा नवीन खरेदी करण्यासाठी हे खरोखरच शुभ दिवस आहेत. मात्र शहर परिवहन तज्ञ या वाढत्या वाहनांची संख्या पाहता चिंता व्यक्त केली आहे. मुंबईतील दुचाकींची संख्या २६ लाखांच्या पुढे गेली आहे, तर शहरातील रस्त्यांवर १२ लाखांहून अधिक नोंदणीकृत कार आहेत.