देशातील आघाडीची कंपनी हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला (HUL) मोठ्या रकमेच्या जीएसटीची नोटीस पाठवली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला एकूण ४४७.५ कोटी रुपयांची जीएसटी नोटीस मिळाली आहे. यात दंडाच्या रकमेचाही समावेश आहे. कंपनीने शेअर बाजारांना पाठवलेल्या पत्रात ही माहिती देण्यात आली आहे.
जीएसटी क्रेडिट नाकारणे, परदेशी नागरिकांना दिलेले पगार आणि भत्ते इत्यादी मुद्द्यांवर ही नोटीस पाठवली आहे. हिंदुस्तान युनिलिव्हर लिमिटेडला गेल्या आठवड्यात शुक्रवारी आणि शनिवारी वेगवेगळ्या झोनच्या जीएसटी अधिकाऱ्यांकडून एकूण पाच डिमांड नोटिस मिळाल्या. “कंपनीला अनुक्रमे ३० डिसेंबर २०२३ आणि ३१ डिसेंबर २०२३ रोजी ऑर्डर प्राप्त झाल्या आहेत. या आदेशांमध्ये CGST आणि सेंट्रल एक्साईज, मुंबई पूर्व सह आयुक्तांनी परदेशी नागरिकांना ३७२.८२ कोटी रुपयांचा कर आणि ३९.९० कोटी रुपयांच्या पगार आणि भत्त्यांच्या दंडाचा समावेश केला आहे. याशिवाय, बंगळुरूच्या कमर्शियल टॅक्स ऑफिसच्या उपायुक्तांनी ८.९० कोटी रुपयांचे अतिरिक्त जीएसटी क्रेडिट आणि कराच्या आधारावर ८९.०८ लाख रुपयांच्या दंडाची मागणी केली आहे.
हे ही वाचा:
पत्रकार परिषद सुरू असतानाचं दक्षिण कोरियाच्या विरोधी पक्ष नेत्यावर हल्ला
दाऊदच्या आईच्या चार मालमत्तांचा शुक्रवारी लिलाव!
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचाराचा उद्रेक!
अरुण योगीराज यांनी साकारलेल्या राममूर्तीची होणार प्रतिष्ठापना!
एचयूएलच्या मते, “या जीएसटी मागण्या आणि दंडाचा कंपनीच्या आर्थिक चक्रावर किंवा व्यवसायावर कोणताही परिणाम होणार नाही. हे आदेश सध्या अपील करण्यायोग्य आहेत आणि आम्ही आमचा अपील करण्याचा अधिकार वापरायचा की नाही याचा विचार करू.” या वृत्तानंतर, मंगळवारी ट्रेडिंग सुरू होताच HUL चे शेअर्स सुमारे एक टक्क्याने घसरले.