भारतीय अर्थव्यवस्था सध्या चांगल्या स्थितीत असून तज्ञांच्या मते अर्थव्यवस्थेत वेगाने वाढ होत आहे. ऑक्टोबर-डिसेंबरमधील जीडीपी ते उत्पादन क्षेत्र आणि जीएसटी संकलनापर्यंत प्रत्येक क्षेत्रात वाढ होत आहे. अशातच परकीय चलनाच्या साठ्याशी संबंधित आकडेवारी समोर आली असून परकीय चलनाच्या गंगाजळीतही कमालीची वाढ झालेली आहे. २३ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यापर्यंतच्या गणनेत असे दिसून आले की सात दिवसांत देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज ३,५१६ कोटी रुपयांची वाढ झाली आहे.
भारतीय रिझर्व्ह बँक म्हणजेच आरबीआय दर आठवड्याला देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीची आकडेवारी जाहीर करते. त्यानुसार, २३ फेब्रुवारी रोजी संपलेल्या आठवड्यात देशाच्या परकीय चलनाच्या साठ्यात सात दिवसांत २.९७ अब्ज डॉलर्स (सुमारे २४,६१५ कोटी रुपये) वाढ झाली आहे. त्यामुळे देशाच्या परकीय चलनाच्या गंगाजळीत दररोज सुमारे ३,५१६ कोटी रुपये आले आहेत.
दरम्यान, आरबीआयच्या अहवालानुसार, २३ फेब्रुवारीपर्यंत देशाचा परकीय चलनसाठा एकूण ६१९ अब्ज डॉलर होता. भारतीय चलनात याचा विचार केला तर अंदाजे ५१,२९,७३० कोटी रुपये आहे. जेव्हा देशाच्या परकीय चलन साठ्याची मोजणी केली जाते, तेव्हा फक्त रिझर्व्ह बँकेकडे असलेले डॉलर्स मोजले जात नाहीत. तर एकूण परकीय चलनाच्या साठ्यामध्ये देशाचा सोन्याचा साठा, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीकडे (IMF) ठेवलेला देशाचा पैसा आणि तेथून मिळालेला SDR यांचा समावेश होतो.
हे ही वाचा:
भारताला भेट देण्यासाठी आलेल्या स्पॅनिश महिलेवर सामूहिक बलात्कार!
बेंगळुरूतील कॅफेमध्ये स्फोट; आयईडी स्फोटके पेरणारा सीसीटीव्हीमध्ये कैद
भाजपचा अँग्री यंग मॅन अण्णामलाई यांचे लोकसभेत आगमन होण्याची शक्यता
‘माझ्या आईचा फोन आला नसता तर…’
देशाच्या परकीय चलन साठ्याला FOREX किंवा Foreign Reserve Exchange असंही म्हटलं जातंय. हा साठा परकीय चलनाच्या रुपात साठवला जातो जेणेकरुन ही रक्कम आवश्यक त्यावेळी वापरता येईल. सध्या भारताचा परकीय चलन साठा हा डॉलरच्या स्वरुपात साठवला ठेवला जातो कारण आंतरराष्ट्रीय स्तरावर डॉलर हे सर्वाधिक वापरलं जाणारं चलन आहे.