मॉर्गन स्टॅनले कंपनीने मॉर्गन स्टॅनले आशिया (सिंगापूर) कंपनीच्या वतीने पेटीएमचे ५० लाख समभागांची खरेदी नॅशनल स्टॉक एक्स्चेंजमधून केली. त्यामुळे या कंपनीचा आता पेटीएममध्ये ०.८ टक्के हिस्सा झाला आहे. पेटीएमच्या प्रत्येक समभागाची सरासरी किंमत ४८७ रुपये २० पैसे आहे. त्यानुसार, मॉर्गन स्टॅनले कंपनीने २४३ कोटी ६० लाखांच्या समभागांची खरेदी केली आहे.
देशाच्या डिजिटल वित्तीय व्यवहारांच्या क्षेत्रातील अग्रणी कंपनी असणाऱ्या ‘पेटीएम पेमेंट्स बँक’वर रिझर्व्ह बँकेने नवीन ठेवी स्वीकारण्यावर आणि नवीन पत व्यवहारांवर शुक्रवारी निर्बंध घातले. परिणामी, त्याचे प्रतिकूल परिणाम ‘पेटीएम’च्या समभागांवर उमटत आहेत. शुक्रवारी सलग दुसऱ्या सत्रात समभागात २० टक्क्यांची घसरण झाली. गेल्या दोन दिवसांत कंपनीच्या समभागांमध्ये ३६ टक्के घसरण झाली आहे.
हे ही वाचा:
संजय राऊतांनी वायफळ बडबड करण्यापेक्षा पुरावे सादर करावेत
राममंदिराबाबत बीबीसीने केलेल्या पक्षपाती वार्तांकनावर ब्रिटिश खासदार संतापला
…अखंड भारताचे स्वप्न पाहणाऱ्या भारत सुपुत्राचा गौरव
पूनम पांडे जिवंत, गर्भाशयाच्या कर्करोगाबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी केला स्टंट
वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेडचा पेटीएम पेमेंट्स बँक लिमिटेडमध्ये ४९ टक्के हिस्सा आहे. तर, वन ९७ कम्युनिकेशनचे संस्थापक विजय शेखर यांच्याकडे आणखी ५१ टक्के हिस्सा आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेकडून पुढील महिन्यात पुन्हा दिला जाईल, असेही सांगितले जात आहे. या संदर्भात अंतिम निर्णय २९ फेब्रुवारीनंतरच घेतला जाईल, असे समजते. तर, पेटीएमची डिजिटल पेमेंट आणि मोबाइल ऍप २९ फेब्रुवारीनंतरही नेहमीप्रमाणे कार्यान्वित राहील, असा निर्वाळा कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी शुक्रवारी स्पष्ट केले.