माहितीच्या अधिकाराअंतर्गत एका प्रश्नाच्या उत्तरातून आलेल्या माहितीनुसार भारतात बॅंकिंग क्षेत्रातील फसवणूक ही वारंवार आणि सर्रासपणे होत असते. रिझर्व बँक ऑफ इंडियाने दिलेल्या माहितीनुसार २०२०- २१ या आर्थिक वर्षात ८३ हजारहून अधिक बॅंकिंग फसवणुकीच्या घटना नोंद झाल्या आहेत. या फसवणुकीत १.३८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले तर यातील एक टक्क्याहून कमी रक्कम पुनर्प्राप्त झाली आहे.
रिझर्व बँकेने दिलेल्या माहितीनुसार २०२०- २१ या वर्षामध्ये दिवसाला सरासरी २२९ फसवणुकीच्या घटना घडल्या आहेत. या आर्थिक वर्षात ८३ हजाराहून अधिक फसवणूकीच्या घटना घडल्या. या फसवणुकीत १.३८ लाख कोटी रुपयांचे नुकसान झाले तर यातील केवळ १ हजार कोटी रुपये पुनर्प्राप्त करण्यात आले म्हणजेच एक टक्क्याहून कमी रक्कम पुन्हा मिळाली.
हे ही वाचा:
विराट म्हणतो रोहित आणि माझ्यात वाद नाहीत
‘दोन वर्षांत राज्य सरकारने न्यायालयाच्या आदेशांचे पालन का केले नाही?’
मुंबईत १६ दिवसांसाठी कलम १४४ लागू
ग्रुप कॅप्टन वरुण सिंह यांची मृत्यूशी झुंज अपयशी
यंदाच्या आर्थिक वर्षातील आकडेवारी ही मागील वर्षीच्या आकडेवारीच्या तुलनेत कमी झाली आहे. मागील आर्थिक वर्षाच्या म्हणजेच २०१९- २०२० मध्ये देशात दररोज २३१ बँकिंग फसवणूकीच्या घटना नोंद झाल्या होत्या. ही सर्व आकडेवारी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ‘इंडिया टुडे’ने दाखल केलेल्या माहितीच्या अधिकाराच्या प्रश्नाला उत्तर देताना उघड केली आहे.
तसेच २०१४- १५ आणि २०२०- २१ या सात आर्थिक वर्षांमध्ये २ लाख ८४ हजार ८१९ फसवणूक प्रकरणांमध्ये बँकांचे ५.९९ लाख कोटी रुपये बुडाले आणि या कालावधीत ४९ हजार कोटी रुपये पुनर्प्राप्त करण्यात आले, असेही समोर आले आहे.