पहिल्या सहामाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात २.६ अब्ज कोटी गुंतवणुकीचा ओघ

पहिल्या सहामाहीत रिअल इस्टेट क्षेत्रात २.६ अब्ज कोटी गुंतवणुकीचा ओघ

चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या सहामाहीमध्ये भारतीय रिअल इस्टेट क्षेत्रात संस्थात्मक गुंतवणूक २.६ अब्ज डॉलरवर गेली आहे. मागील वर्षातल्या सहामाहीतील कोविड महामारीच्या व्यत्ययानंतर त्यात तब्बल १४ टक्क्यांनी वाढ झाली आहे. देशातील रिअल इस्टेट क्षेत्रात होत असलेल्या सुधारणांमुळे गुंतवणूकदार उत्साहित झाले असल्याचे कोलिअर्स इंडियाने प्रसिद्ध केलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे. विशेष म्हणजे या वर्षीच्या पहिल्या सहामाहीत देशात झालेल्या संस्थात्मक गुंतवणुकीत ऑफिस क्षेत्राने ४८ टक्के वाटा प्राप्त करत रिटेल क्षेत्राला मागे टाकले आहे.

२०२२ च्या पहिल्या सहामाहीत व्यवसाय क्षेत्राला पुन्हा मिळालेली गती, भाडेपट्टीवर कार्यालये आणि औद्योगिक जागा घेण्याचे वाढलेले प्रमाण, रिटेल आणि प्रवास क्षेत्रात वाढलेले खर्चाचे प्रमाण, निवासी बांधकाम क्षेत्रात आलेली तेजी, या कारणामुळे संस्थात्मक गुंतवणुकीचा ओघ वाढला आहे.

हे ही वाचा:

पाकिस्तान दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर; आंतरराष्ट्रीय रेटिंग एजन्सींनी दिला इशारा

नवीन संसद भवनात पंतप्रधान मोदींनी भव्य अशोक स्तंभाचे केले अनावरण

सोबतच्या पंधरा आमदारांना उद्धव ठाकरेंचं भावनिक पत्र

१६ आमदारांबाबत सर्वोच्च न्यायालयाचा दिलासा

सध्याचे भौगोलिक आणि राजकीय तणावाचे वातावरण तसेच अपेक्षित जोखीम परताव्यातील वाढीमुळे बाजार काही सावधगिरी बाळगत आहे. परंतु सध्याच्या व्यावसायिक वातावरणामुळे, वाढत्या भांडवली प्रवाहासह आशियाई अर्थव्यवस्थांमधून भारताला सर्वाधिक फायदा होईल, असे कोलिअर्स इंडियाच्या भांडवली गुंतवणूक आणि देखरेख सेवा विभागाचे व्यवस्थापकीय संचालक पीयूष गुप्ता यांनी सांगितले.

Exit mobile version