गाड्यांच्या नोंदणीत १७ टक्क्यांनी तर दुचाकींच्या १२ टक्क्यांनी वाढ

गाड्यांच्या नोंदणीत १७ टक्क्यांनी तर दुचाकींच्या १२ टक्क्यांनी वाढ

दिवाळीत विशेषतः धनत्रयोदशीच्या दिवशी गाडी घेण्याचा मुहूर्त साधला जातो. यंदाही हाच कल दिसून आला आहे. दिवाळीत नवीन गाड्यांची नोंदणी करण्याचे प्रमाण गेल्या वर्षीच्या तुलनेत १७ टक्क्यांनी तर, दुचाकी नोंदणीचे प्रमाण १२ टक्क्यांनी वाढले आहे. वाहतूक पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीत ही माहिती उघड झाली आहे.

धनत्रयोदशीच्या १५ दिवस आधी चार हजार २५९ गाड्यांचे बुकिंग आणि नोंदणी झाली. गेल्या वर्षी हीच संख्या तीन हजार ६५४ होती. तर, गेल्या वर्षीच्या दिवाळीत आठ हजार ६५५ गाड्यांची नोंदणी झाली होती. हीच संख्या यंदा नऊ हजार ७०७वर पोहोचली. यंदा गाड्यांमध्ये ७९७ इलेक्ट्रॉनिक तर, एक हजार ६८८ सीएनजीवर चालणाऱ्या गाड्यांचा समावेश असल्याचे एका वरिष्ठ वाहतूक अधिकाऱ्याने सांगितले.

सर्वाधिक गाड्यांची नोंदणी ताडदेवच्या आरटीओमध्ये झाले. तर, वडाळा आरटीओमध्ये सर्वाधिक दुचाकींची नोंदणी झाली. या वर्षी मोठ्या संख्येने लोक दिवाळी साजरी करण्यासाठी बाहेर पडले आहेत. गाडी खरेदी करण्याकडेही कल अधिक आहे.

अनेकांनी नवीन गाडी किंवा दुचाकी घेण्यापूर्वी शोरूरमबाहेरच शुक्रवारी पूजा केली, असे कार डीलरने सांगितले. वर्षभरातून चार दिवस गाड्यांची मोठ्या प्रमाणात खरेदी होते. ते दिवस म्हणजे धनत्रयोदशी, दसरा, गुढीपाडवा आणि अक्षय तृतीया. आता वाहतूक विभागाने गाडी आणि दुचाकी डीलरनाच गाड्यांची संपूर्ण नोंदणी करण्याचे आणि शुल्क भरण्याचे अधिकार दिले आहेत. त्यामुळे आता नोंदणीसाठी आरटीओ कर्मचाऱ्यांची कमीत कमी मदत घेतली जाते. सर्व प्रक्रिया ऑनलाइन असल्याने भ्रष्टाचार होण्याचाही किमान शक्यता आहे.

मुंबईकर सध्या एकाहून अधिक वाहने घेत आहेत. काही कुटुंबांकडे तर तीन किंवा पाच गाड्या आहेत. ही सर्व मध्यमवर्गीय माणसे कर्ज काढून गाड्यांची खरेदी करत आहेत, असे वाहतूकतज्ज्ञ विवेक पै यांनी सांगितले. ‘जोपर्यंत सुरुवातीपासून ते शेवटपर्यंत खात्रीशीर आणि आरामदायी सार्वजनिक वाहतुकीची सेवा मिळत नाही, तोपर्यंत अशा खासगी गाड्या आणि दुचाकींची संख्या वाढतच जाईल,’ असा इशारा पै यांनी दिला आहे.

हे ही वाचा: 

उत्तर प्रदेशात चार हात- चार पायाच्या मुलाचा जन्म

कंत्राटी कामगारांना दिवाळी भेट; ५८० सफाई कामगारांना सेवेत कायम करण्याचा आदेश

बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून दुसरे समन्स

सौरव दादाने सांगितली रोहित शर्माच्या कर्णधार पदामागाची रंजक गोष्ट

या आठवड्यात शहरातील वाहनसंख्येने ४५ लाखांचा टप्पा ओलांडला आहे. त्यामुळे रस्त्यांवर वाहनांची गर्दी झाली आहे. आता प्रत्येक किमीसाठी शहरात दोन हजार २५० वाहने आहेत. पाच वर्षांत ही संख्या सात लाखांहून अधिक झाली आहे, त्यापैकी या वर्षाच्या पहिल्या १० महिन्यांत जवळपास दोन लाख वाहनांची नोंदणी झाली आहे.

Exit mobile version