हिंडेनबर्गच्या अहवालादरम्यान अदानी शेअर्सच्या शॉर्ट सेलिंगमुळे १२ कंपन्या नफ्यात

हिंडेनबर्गच्या अहवालादरम्यान अदानी शेअर्सच्या शॉर्ट सेलिंगमुळे १२ कंपन्या नफ्यात

अदानी समूहाविरुद्ध हिंडेनबर्ग संशोधनाचा अहवाल समोर आल्यानंतर कंपनीच्या शेअरमध्ये मोठी घसरण झाली होती. या प्रकरणात, ईडीने आपल्या तपास अहवालात म्हटले आहे की, सुमारे १२ कंपन्या, परदेशी पोर्टफोलिओ गुंतवणूकदार आणि परदेशी संस्थात्मक गुंतवणूकदारांनी शॉर्ट सेलिंगद्वारे चांगला नफा कमावला होता.

शॉर्ट सेलिंग हे स्टॉक मार्केटमधील एक तंत्र आहे ज्याद्वारे सिक्युरिटीज विकण्यासाठी कर्ज घेतले जातात. अशा स्थितीत जेव्हा शेअरची किंमत घसरते तेव्हा पुन्हा खरेदी करून नफा मिळवला जातो. असे गुंतवणूकदार कोणत्याही शेअरची किंमत कमी झाल्यावर त्यातून नफा कमावतात. ईडीने या प्रकरणाची चौकशी केल्यानंतर त्याचा अहवाल सोपवला आहे. ज्या शॉर्ट सेलरने अदानीचे शेअर्स शॉर्ट विकले होते त्यापैकी एकाही व्यक्तीने त्यांच्या मालकीची माहिती आयकर विभागाला दिली नव्हती.

ईडीच्या निष्कर्षांवरून असे दिसून आले की, यापैकी काही शॉर्ट विक्रेत्यांनी हिंडनबर्ग संशोधन अहवाल प्रकाशित होण्याच्या केवळ दोन- तीन दिवस आधी पोझिशन सुरू केल्या होत्या, तर काहींनी प्रथमच शॉर्ट सेलिंग केले होते. तपासणीनुसार, समोर आले की, तीन कंपन्या भारतातील आहेत, एक विदेशी बँकेची भारतीय शाखा आहे. चार संस्था मॉरिशसमध्ये आहेत आणि प्रत्येकी एक फ्रान्स, हाँगकाँग, केमन बेटे, आयर्लंड आणि लंडनमध्ये आहेत.

अहवालानुसार, टॉप शॉर्ट सेलरमध्ये दोन भारतीय कंपन्या आणि एका परदेशी बँकेच्या भारतीय शाखेचा समावेश आहे. एक भारतीय कंपनी नवी दिल्लीत तर दुसरी मुंबईत नोंदणीकृत आहे. सेबीने दिल्लीतील नोंदणीकृत कंपनीच्या प्रवर्तकाविरुद्ध गुंतवणूकदारांची दिशाभूल आणि शेअर बाजारात हेराफेरी केल्याप्रकरणी आदेश पारित केला होता.

हे ही वाचा:

मद्य धोरण योजेनातील आरोपीकडून लाच घेणाऱ्या ईडी अधिकाऱ्याला अटक

२८ फुटी नटराज मूर्तीचा अडीच हजार किमी प्रवास

प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूकीत महाराष्ट्र अव्वल

आशिया चषकावर भारतीय महिला हॉकी संघाने कोरले नाव

अदानी समूहाने मात्र असे आरोप फेटाळून लावले होते. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने सेबीला तपास अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. सुप्रीम कोर्टाने तज्ज्ञ समितीची स्थापना केली होती, ज्याने अदानी समूहाने या प्रकरणात कोणताही गैरप्रकार नसल्याचे म्हटले होते.

Exit mobile version