अयोध्येत २२ जानेवारी रोजी मोठ्या दिमाखात आणि उत्साहात राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळा पार पडला. त्यानंतर लगेचच दुसऱ्या दिवसापासून मंदिर भाविकांसाठी खुलं करण्यात आलं. त्यामुळे मोठ्या संख्येने राम भक्तांनी राम मंदिरात दर्शानासाठी गर्दी केल्याचे चित्र आहे. देश- विदेशातून भाविकांची रांग मंदिरात लागलेली आहे. यातूनच राम मंदिरात गेल्या ११ दिवसात मोठी देणगी गोळा झाली आहे.
प्राणप्रतिष्ठा सोहळ्यापासून गेल्या ११ दिवसांत सुमारे २५ लाख भाविकांनी अयोध्येतील राम मंदिराला भेट दिली आहे. अयोध्येत येणाऱ्या भाविकांची संख्या वाढणार असल्याचा अंदाज पूर्वीपासूनच व्यक्त करण्यात येत होता. आतापर्यंत सुमारे २५ लाख भाविकांनी प्रभू श्री रामाचे दर्शन घेतले आहे. यासोबतच गेल्या ११ दिवसांत राम मंदिराला मोठी देणगीही मिळाली आहे. राम मंदिराला गेल्या ११ दिवसांत ११ कोटी रुपयांची देणगी मिळाली आहे. राम मंदिराच्या दानपेटीत ८ कोटी रुपये आणि चेक, ऑनलाइन व्यवहारांद्वारे सुमारे ३.५ कोटी रुपये जमा झाले आहेत.
हे ही वाचा:
मालदीवमधून १० मेपर्यंत भारतीय सैनिक मायदेशी परतणार
भाजप आमदार गणपत गायकवाड यांचा शिवसेना नेत्यावर पोलिस ठाण्यातच गोळीबार
दादरचा महात्मा गांधी जलतरण तलाव गुदमरतोय
अयोध्येतील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानंतर राज्यात झपाट्याने वाढणाऱ्या धार्मिक पर्यटनामुळे पर्यटकांची संख्याही वाढत आहे. राज्यात धार्मिक पर्यटनासाठीही सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत, अशी माहिती देण्यात आली आहे. उत्तर प्रदेशात धार्मिक पर्यटनासाठी सरकारने अनेक पर्याय उपलब्ध करून दिले आहेत. भगवान श्री रामाची नगरी अयोध्या आणि काशी ही प्रमुख धार्मिक पर्यटन स्थळे आहेत. २०२३ मध्ये ५.७६ कोटी पर्यटकांनी अयोध्येला तर ८.५५ कोटी पर्यटकांनी काशीला भेट दिली आहे. पर्यटकांच्या संख्येत वाढ होणार ही शक्यता वर्तविण्यात आली होती. पर्यटकांच्या संख्येच्या बाबतील संपूर्ण देशात उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.