23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरअर्थजगतमुंबई आयआयटी; मुलांना कोटीकोटी

मुंबई आयआयटी; मुलांना कोटीकोटी

Google News Follow

Related

मुंबई आयआयटीमधील प्लेसमेंटचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. यामध्ये अनेक विद्यार्थ्यांना कोट्यवधी रुपयांचे पॅकेजेस मिळाले आहेत. मुंबई आयआयटीत सरासरी वार्षिक पॅकेज आणि नोकरांच्या प्रस्तावात मागील वर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे. यंदा ८५ विद्यार्थ्यांना १ कोटीहून अधिकचे वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

मुंबई आयआयटीमध्ये पहिल्या टप्प्यात जपान, तैवान, दक्षिण कोरिया, नेदरलँड्स, सिंगापूर आणि हाँगकाँगस्थित एकूण ६३ आंतरराष्ट्रीय स्तरावरील नोकरीच्या संधी विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाल्या होत्या. मागील वर्षीच्या प्लेसमेंटच्या तुलनेत यंदाच्या वर्षी सरासरी विद्यार्थ्यांच्या पॅकेजमध्ये सुद्धा वाढ झाल्याचे चित्र आहे. मुंबई आयआयटीतील एकूण ८५ विद्यार्थ्यांना यंदाच्या प्लेसमेंटच्या पहिल्या टप्प्यात १ कोटीहून अधिक वार्षिक पॅकेज मिळाले आहे.

मुंबई आयआयटी नोकरीसाठीच्या कॅम्पस मुलाखतीसाठी एकूण ३८८ देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय कंपन्यानी सहभाग घेतला होता. मागील शैक्षणिक वर्षात प्लेसमेंटमध्ये १६ विद्यार्थ्यांनी 1 कोटी पेक्षा अधिक वार्षिक पॅकेजचा स्वीकारले होते, यंदा पहिल्या टप्प्यात ८५ विद्यार्थ्यांना एक कोटींहून अधिकचं पॅकेज मिळालं आहे.

यंदा सरासरी पॅकेजमध्ये सुद्धा वाढ झाली आहे. गेल्यावर्षी २१.८२ लाख रुपये सरासरी वार्षिक पॅकेज होते तर यंदा २४.०२ लाख रुपये सरासरी वार्षिक पॅकेज देण्यात आले आहे. नोकरीच्या प्रस्तावांमध्येही यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढ दिसून आली.

हे ही वाचा:

चहाचा आस्वाद घेतल्यानंतर आता मोदींचे मीरा मांझींना पत्र!

२५० रुपये मोजा आणि शिवडी न्हावाशेवा अटल सेतूवरून प्रवास करा!

न्यायनिवाडा करताना नेवाडात आरोपीची न्यायाधीशांवर उडी!

यंदा २० डिसेंबरपर्यंत एकूण १ हजार ३४० नोकरीचे प्रस्ताव विविध कंपन्यांनी दिले त्यापैकी १ हजार ११८ विद्यार्थ्यांना नोकरी मिळविण्यात यश आले. यामध्ये पीएसयूमध्ये सात जणांचा तसेच इंटर्नशिपद्वारे २९७ पीपीओचा समावेश असून यापैकी नोकरीचे २५८ प्रस्ताव स्वीकारण्यात आले आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा