24 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरक्राईमनामापाकिस्तानात दहशतवाद्याला ठोकले

पाकिस्तानात दहशतवाद्याला ठोकले

Google News Follow

Related

पाकिस्तानमधील भारतविरोधी दहशतवाद्यांचा हळूहळू निःपात होत आहे. खैबर पख्तूनख्वामध्ये अज्ञात व्यक्तींनी लश्कर-ए-तैयबाचा कमांडर अक्रम गाझी याची गोळी मारून हत्या करण्यात आली. आठवड्याभरातील ही दुसरी हत्या आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अक्रम खान उर्फ गाझी सन २०१८ ते २०२० दरम्यान लश्करसाठी दहशतवाद्यांची भरती करत होता. गेल्या दोन वर्षांत काश्मीर खोऱ्यात घुसखोरी करणाऱ्या दहशतवाद्यांना कट्टरवादी बनवण्यासाठीही तो जबाबदार होता.

रविवारी जम्मू काश्मीरमध्ये सन २०१८मधील सुंजवान दहशतवादी हल्ल्याच्या मास्टरमाइंडपैकी एक ख्वाजा शाहिदचे अपहरण झाले होते. त्यानंतर पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ त्याचा शिरच्छेद केलेला मृतदेह सापडला होता.
गाझी हा लश्करचा केंद्रीय भरती सेलचा एक प्रमुख सदस्य होता. भारताविरोधात द्वेषपूर्ण भाषण देण्यासाठी तो ओळखला जात होता. बाजौर जिल्ह्यात दुचाकीवर स्वार होऊन आलेल्या मारेकऱ्यांनी त्याची गोळी झाडून हत्या केली होती. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय या हत्यांची संख्या कमी करण्यासाठी प्रयत्नशील आहे.

लश्करच्या मोठ्या दहशतवाद्यांपैकी ही दुसरी हत्या आहे. सप्टेंबमरध्ये पाकव्याप्त काश्मीरमधील रावळकोटमध्ये अल कुद्दूस मशिदीबाहेर लश्कर कमांडर रियाझ अहमदची हत्या करण्यात आली होती. तो पीओकेमध्ये लश्करच्या भरतीचे काम सांभाळत होता. गाझीची हत्या हा लश्कर आणि आसएसआयला मोठा धक्का मानला जात आहे. मे महिन्यात खलिस्तानी दहशतवादी परमजीतसिंग पंजावार याची त्याच्या घराबाहेर हत्या करण्यात आली होती. तो सकाळी चालण्यासाठी बाहेर पडत असताना दोन बंदुकधाऱ्यांनी त्याची हत्या केली होती.

हे ही वाचा:

कंगाल पाकिस्तानकडे पासपोर्ट लॅमिनेशन करायला पेपरचं नाही!

हमास आणि पाकिस्तानचा सातत्याने कडवा प्रतिकार करावा लागेल!

बिहारमध्ये आता ६५ टक्के आरक्षण!

घरकाम करणाऱ्या बाईच्या बेपत्ता मुलीसाठी सनी लिओनी धावून आली!

लश्कर-ए-तैबाचा मौलाना जियाऊर रहमान याची कराचीमधील गुलिस्तान-ए-जौहर परिसरात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती. मुफ्ती कैसर फारूक याचीही गुलशन-ए-उमर मदरशात गोळी झाडून हत्या करण्यात आली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
196,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा