30 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरविशेषमेट्रोची कामे थांबवा, महापालिकेचे आदेश!

मेट्रोची कामे थांबवा, महापालिकेचे आदेश!

वाढते प्रदूषण, नियमांचे उल्लंघन केल्यामुळे कारवाई

Google News Follow

Related

मुंबईतील मेट्रो कंत्राटदारांना तात्काळ काम थांबवण्याचे आदेश मुंबई महापालिकेने दिले आहेत.वाढत्या प्रदूषणामुळे तसेच नियमांचे उल्लंघन करत काम चालू ठेवल्याने मेट्रोच्या कामाला तात्काळ स्थगिती देण्यात आली आहे.मुंबई महापालिकेकडून तशा नोटीसा मेट्रो कंत्राटदारांना पाठवण्यात आल्या आहेत.

वाढत्या प्रदूषणामुळे गेल्या काही दिवसांपासून देशातील वातावरण बिघडले आहे.या प्रभूषणाचा फटका मुंबईला देखील जास्त प्रमाणात बसला आहे.अशात दिवाळीच्या सणामुळे यात अजून भर पडणार आहे.प्रदूषण रोखण्यासाठी मुंबई महानगरपालिका सर्वोतोपरी प्रयत्न करताना दिसत आहे.प्रदूषणाला आला बसवण्यासाठी मुंबई महापालिकेकडून मुंबईतील मेट्रो कंत्राटदारांना तात्काळ काम बंद करण्याच्या नोटीस पाठवण्यात आली आहेत.प्रदूषण रोखण्यासाठी लागू केलेली नियमावली न पाळल्यामुळे नोटीस बजावण्यात आलीय.

मुंबईत प्रदूषण कमी करण्यासाठी प्रशासनाकडून मार्गदर्शक तत्वे जारी करण्यात आले आहेत. मात्र या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन बीकेसी भागात योग्य रीतीने होत नसल्याने मुंबईतील मेट्रो तीनचे काम करणाऱ्या कंत्राटदाराला बीएमसीकडून काही दिवस काम बंद करण्याची नोटीस देण्यात आली आहे.वांद्रे पूर्व आणि सांताक्रुज पूर्व या ठिकाणी सुरू असलेल्या बांधकाम कामांना सुद्धा मुंबई महापालिकेने नियमांचे उल्लंघन करत असल्या प्रकरणी या साईटवर काम बंद करण्याबाबत नोटीस पाठवण्यात आली आहे.

हे ही वाचा:

आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप

झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!

संगमनेर कारागृहातून चार कैद्यांचे पलायन!

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाकडून सुद्धा मुंबईतील १४ प्लांटसला नोटीस पाठवली आहे. जे मुख्यत्वे करून मुंबईतील कोस्टल रोड, एमटीएचएल, मेट्रो कॉरिडॉर यासारखे विकास प्रकल्पांची काम करत आहेत. मुंबई मेट्रो तीन लाईनच्या कामामध्ये आयटीओ जंक्शन येथे बांधकाम सुरू असताना एका साइट बॅरिकेड केलेली नव्हती किंवा ताडपत्री/हिरव्या कापडाने साईट झाकलेली नव्हती आणि कामगारांना मास्क दिले गेले नव्हते हे अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आले आणि त्यानंतर त्यांना काम थांबवण्याबाबत नोटीस देण्यात आली आहे.मुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज्यातल्या वायू प्रदूषणासंदर्भात आज आढावा घेणार आहे. पर्यावरण आणि हवामान बदल विभाग, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ आणि मुंबई महापालिकेतील कर्मचारी राहाणार बैठकीला उपस्थित राहणार आहे.

 

 

 

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा