जम्मू काश्मीरमधील शोपियामध्ये सुरक्षारक्षकांची मोठी मोहीम सुरू आहे. येथे सुरू असलेल्या चकमकीत भारतीय सैनिकांनी एका दहशतवाद्याला कंठस्नान घातले आहे. गुरुवार पहाटेपासून लष्कर आणि स्थानिक पोलिसांची संयुक्त मोहीम सुरू आहे. यात मारला गेलेला दहशतवादी लश्कर-ए-तैबाची शाखा टीआरएफचा सदस्य असल्याचे सांगितले जाते.
जम्मू काश्मीरमध्ये गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद्यांचा माग काढून त्यांना कंठस्नान घातले जात आहे. यात लष्करासह स्थानिक पोलिसांचे पथकही कसून तपास करत आहे. खबऱ्यांचे जाळेही संपूर्ण राज्यात पसरले असल्याने पोलिस आणि लष्कराला राज्यातील बित्तंबातमी पोहोचते आहे. यावरूनच दहशतवाद्यांविरोधात मोहीम राबवली जात आहे.
जम्मू-काश्मीरच्या शोपियामधील कैथोहलान परिसरात गुरुवारी लष्कर आणि स्थानिक पोलिसांच्या संयुक्त पथकाने दहशतवाद्याला कंठस्नान घातले. मारला गेलेला दहशतवादी लश्कर-ए-तैबाची एक शाखा आणि प्रतिबंधित संघटना द रेझिस्टन्स फ्रंटचा (टीआरएफ) सदस्य होता. या परिसरात दहशतवाद्यांचा वावर सुरू असल्याची खबर मिळाली होती. त्यानंतर या संयुक्त पथकाने लगचेच या परिसराच्या दिशेने कूच केले.
हे ही वाचा:
आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश
आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप
झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!
मारल्या गेलेल्या दहशतवाद्याचे नाव मैसेर अहमद डार असल्याचे समजते. तर, दुसरीकडे पाकिस्तान लष्कराने रामगड सेक्टरमध्ये आंतरराष्ट्रीय सीमेवर शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे. पाकिस्तान लष्कराने केलेल्या या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाल्याची माहिती लष्करातर्फे देण्यात आली.