31 C
Mumbai
Monday, November 25, 2024
घरधर्म संस्कृतीबागेश्वर धामच्या दरबारात जमीर शेख कुटुंबीयांची हिंदू धर्मात घरवापसी

बागेश्वर धामच्या दरबारात जमीर शेख कुटुंबीयांची हिंदू धर्मात घरवापसी

नऊ सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात केला प्रवेश

Google News Follow

Related

छत्रपती संभाजीनगर शहरात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची बुधवार, ८ नोव्हेंबर रोजी सांगता झाली. दरम्यान, या कार्यक्रमात काही मुस्लीम कुटुंबांनी हिंदू धर्मात प्रवेश केला. अहमदनगर येथील जमीर शेख यांच्या कुटुंबातील एकूण नऊ सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. हे सर्व लोकं आपल्या इच्छेने हिंदू धर्मात दाखल झाले असल्याचे बागेश्वर धाम म्हणाले.

मुस्लीम असलेल्या जमीर शेख यांनी हिंदू धर्म स्वीकारताना बागेश्वर धाम यांचे आभार मानले. तर, लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करतो. त्यामुळे सनातन धर्मावरील श्रद्धेमुळेच आपण धर्मांतर करीत असल्याचे शेख म्हणाले. एवढंच नाही तर आपल्या दोन्ही मुलींची लग्ने सुद्धा हिंदू धर्मात करून दिल्याचे शेख म्हणाले.

बागेश्वर धाम यांचे व्हिडिओ आपण मोबाईलवर पहिले आणि आपल्यातील सनातनी जागा झाला. त्यानंतर बजरंग दलाच्या पदाधिकारी यांच्या मदतीने कार्यक्रमात पोहचले असून, पुन्हा हिंदू धर्म स्वीकारले असल्याचे शेख म्हणाले.

हे ही वाचा:

आयपीएस अधिकाऱ्यासह तीन पोलिसांवर विभागीय कारवाईचे निर्देश

आरक्षणाला विरोध करणाऱ्या तरुणाला मराठा आंदोलकांकडून चोप

झोपण्याची दोन इंच जागा कमी झाल्याने कैद्यांची न्यायालयात धाव

राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत ११ निर्णयांना मान्यता!

सकल हिंदु जनजागरण समितीतर्फे धीरेंद्र शास्त्री यांना ‘हिंदु हृदयाचार्य’ ही उपाधी देत असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी यावेळी जाहीर केले. शहरातील रेल्वे स्टेशन भागातील अयोध्या मैदानात बागेश्वर धाम यांचे दरबार भरले होते. त्यांच्या याच कार्यक्रमाची बुधवारी सांगता झाली. मात्र, शेवटच्या दिवशी या कार्यक्रमाच्या आरती आणि शुभसंदेशसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, ते वेळेअभावी येवू शकले नसल्याचे आयोजकांकडून सांगण्यात आले आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
197,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा