इस्रायल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या युद्धामुळे जगभरात तणाव वाढत असताना हे युद्ध भारतासाठी संधीचे द्वार ठरू शकणार आहे. गाझामध्ये सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर इस्रायल सरकार एक लाख भारतीयांना त्यांच्या देशात नोकरी देण्याची तयारी करत आहे. जर असे झाल्यास इस्रायलमध्ये काम करणाऱ्या पॅलिस्टिनींची जागा भारतीय घेतील. या नोकऱ्या बांधकाम क्षेत्रात मिळतील.
‘जर इस्रायल सरकार मंजुरी देत असेल तर, इस्रायलच्या बांधकाम कंपन्या एका लाख भारतीयांना नोकरी देण्यासाठी तयार आहेत. जे ९० हजार पॅलिस्टिनी नागरिकांची जागा घेतील,’ असे इस्रायल बिल्डर्स असोसिएशनचे उपाध्यक्ष हाएम फेगलिन यांनी सांगितले. सध्या ते याबाबत भारताशी चर्चा करत असून इस्रायल सरकारच्या मंजुरीची वाट पाहात आहेत. इस्रायलच्या बांधकाम क्षेत्राला ५० हजार ते एक लाख भारतीयांची मदत होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे. मात्र परराष्ट्र मंत्रालयाकडून याबाबत कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
हे ही वाचा:
रश्मिकाच्या समर्थनार्थ अभिनेते सरसावले!
दापोलीतील वादग्रस्त साई रिसॉर्ट पाडण्याचे आदेश
बॉडी बॅग खरेदी घोटाळयाप्रकरणी किशोरी पेडणेकरांना ईडीकडून समन्स
छत्तीसगडमध्ये मतदानादरम्यान स्फोट
इस्रायलच्या बांधकाम क्षेत्रात २५ टक्क्यांहून अधिक कामगार भारतीय आहेत. इस्रायल आणि हमास यांच्यातील युद्धाच्या पार्श्वभूमीवर हे कामगार कामावर येऊ शकलेले नाहीत किंवा त्यांना कामावर येण्यासाठी इस्रायल सरकारकडून मंजुरी मिळू शकलेली नाही. पॅलिस्टाइनमधून इस्रायलमध्ये काम करण्यास जाणारे १० टक्के कर्मचारी गाझा पट्टीतील निवासी आहेत तर, उर्वरित वेस्ट बँकचे रहिवासी आहेत.मे महिन्यात इस्रायल आणि भारत यांच्यात एक करार झाला होता. यानुसार, ४२ हजार भारतीयांना इस्रायलमध्ये काम करण्याची परवानगी देण्यात आली होती. ते भारतीय कर्मचारी बांधकाम आणि नर्सिंग क्षेत्रात काम करणार होते. इस्रायलचे परराष्ट्र मंत्री एली कोहेन यांनी भारत दौऱ्यादरम्यान ९ मे रोजी या करारावर स्वाक्षरी केली होती.