अयोध्येत उभारल्या जात असलेल्या भव्य श्रीराम मंदिराच्या १६पैकी १४ द्वारांना सुवर्णाने मढवण्याचे काम पूर्ण झाले आहे. आठ एकर जागेवर उभारल्या जात असलेल्या मंदिर परिसराच्या कुंपणभिंतीचे कामही ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. प्राणप्रतिष्ठेपूर्वी हे मंदिर स्वागतासाठी सज्ज आहे.
राममंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याच्या पूर्वतयारीसाठी भवन निर्माण समितीची बैठक बोलावण्यात आली होती. ही बैठक तब्बल पाच तास चालली. त्यामध्ये राम मंदिराच्या सर्व कामांचा आढावा घेण्यात आला. राम मंदिरात सुमारे १६६ स्तंभ उभारण्यात आले आहेत. ज्यात आयकोनोग्राफी करून रामायणातील प्रसंग कोरण्यात येणार आहेत.
३१ डिसेंबरपर्यंत ७० स्तंभांवर मूर्ती कोरल्या जातील. या मंदिराच्या लाद्यांचे तसेच मंदिराची विद्युतकामेही ३१ डिसेंबरपर्यंत पूर्ण होतील, अशी माहिती श्रीरामजन्मभूमी तीर्थक्षेत्राचे विश्वस्त डॉ. अनिल मिश्र यांनी दिली. मंदिराच्या आठ एकर जागेवर विस्तारलेल्या कुंपणभितींचे काम ३१ डिसेंबर २०२४पर्यंत पूर्ण होणार आहे. या लगतच ७९५ मीटर प्रदक्षिणा मार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. ३१ डिसेंबर २०२३पर्यंत अर्धेच काम पूर्ण होईल. तरीही प्राणप्रतिष्ठेसाठी येणाऱ्या भाविकांच्या स्वागतासाठी प्रवेशद्वाराचे काम पूर्ण होईल. राम मंदिर परिसरात विद्युत पुरवठ्यासाठी उपकेंद्राचे कामही वेगात सुरू आहे. तेही काम वेळेत पूर्ण होईल, असे मानले जात आहे.
हे ही वाचा:
बंबल डेटिंग ऍपवर झाली ओळख, बॉयफ्रेन्डने चुना लावला!
मणिपूरच्या पोलिसांचे आसाम राय़फल्सने वाचवले प्राण!
‘जश्न ए दिवाळी’ला जोरदार विरोध
कुपवाड्यातील भारत-पाक सीमेवर ‘छत्रपती शिवाजी महाराज’!
अमेरिकेतील न्यूयॉर्कमधील एक डझनहून अधिक भाविकांनी सोमवारी अयोध्यानगरीला भेट दिली. त्यांनी श्रीरामजन्मभूमी जाऊन रामलल्लाचे दर्शनही घेतले.