32 C
Mumbai
Saturday, October 19, 2024
घरविशेषदिल्लीच्या हवेचा दर्जा किंचित सुधारला, पण धोका कायमच

दिल्लीच्या हवेचा दर्जा किंचित सुधारला, पण धोका कायमच

गाड्यांना रस्त्यावर उतरविण्यासाठी समविषम पद्धत

Google News Follow

Related

दिल्लीच्या हवेच्या दर्जात थोडीफार सुधारणा झाली असून मंगळवारी हवेचा दर्जा ‘अति वाईट’ श्रेणीच्या दिशेने वाटचाल करत आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी सकाळी सात वाजता दिल्लीचा हवा गुणवत्ता आलेख (एअर क्वालिटी इंडेक्स) ३९६ नोंदला गेला. मात्र शहरातील बहुतेक हवा निरीक्षण केंद्रांत हवेचा दर्जा ‘सुमार’च नोंदला गेला.

नवी दिल्लीतील आनंद विहारमध्ये एक्यूआय ‘सुमार’ म्हणजे ४३८ नोंदला गेला. तर, ओखला फेज २ (४२२), रोहिणी (४४४), पंजाबी बाग (४३७), न्यू मोती बाग (४१०) येथेही सुमार दर्जाची नोंद झाली. दिल्लीच्या वातावरणात जाड धुरक्याचा थर पसरला होता. सोमवारी संपूर्ण दिल्लीचा एक्यूआय ४३७ म्हणजे सुमार नोंदवण्यात आला होता.

एक्यूआयच्या आलेखानुसार, शून्य ते ५० पर्यंत नोंद असलेला हवेचा दर्जा ‘चांगला’, ५१ ते १००पर्यंत ‘समाधानकारक’, १०१ ते २००पर्यंता ‘मध्यम’, २०१ ते ३०० पर्यंतचा ‘वाईट’, ३०१ ते ४०० पर्यंतचा ‘अति वाईट’ आणि ४०१ ते ४५०पर्यंतचा ‘सुमार’ आणि ४५० पुढील दर्जा ‘अतिसुमार’ म्हणून गणला जातो.

दिल्लीचा प्रदूषणस्तर कमी करण्यासाठी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सोमवारी उच्चस्तरीय बैठक बोलावली होती. त्यावेळी दिल्लीचे पर्यावरणमंत्री गोपाल राय आणि अन्य अधिकारीही उपस्थित होते. या बैठकीत ठरल्याप्रमाणे, १३ नोव्हेंबर ते २० नोव्हेंबर या कालावधीत दिल्लीमध्ये समविषम गाड्यांना रस्त्यांवर उतरवण्याची परवानगी दिली जाणार आहे.

हे ही वाचा:

आणि डॉक्टर शस्त्रक्रिया सोडून निघून गेले!

नेपाळमध्ये ५.६ रिश्टर स्केल भूकंपाच्या धक्क्यात आठ हजार घरांचे नुकसान!

शाकीब, बांगलादेशबद्दल आदर आता कमी झाला!

मराठी भाषा विद्यापीठ पुढील वर्षी जूनपासून सुरू करण्याचे नियोजन

प्राथमिक शाळा १० नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्यात येणार आहेत. तर, इयत्ता सहावी ते बारावीच्या विद्यार्थ्यांपर्यंत सर्व शाळांना ऑनलाइन वर्ग घेण्यास सांगण्यात आले आहे. याआधी प्राथमिक शाळा ४ नोव्हेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश दिले होते. तर, अत्यावश्यक नसलेले सामान वाहून आणणाऱ्या ट्रकना बंदी घालण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा