सन २०१८मध्ये जम्मू आणि काश्मीरमधील सुंजुवान भागातील भारतीय लष्कराच्या तळावर केलेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार लश्कर-ए-तेयबाचा कमांडर ख्वाजा शाहिद उर्फ मिया मुजाहित याचा शिरच्छेद केलेला मृतदेहपाकव्याप्त काश्मीरमधील नियंत्रण रेषेनजीक आढळला आहे. सन २०१८मध्ये भारतीय लष्कराच्या तळावर झालेल्या या दहशतवादी हल्ल्यात पाच लष्करी जवानांसह सहा जण ठार झाले होते.
पाकव्याप्त काश्मीरमध्ये नियंत्रण रेषेजवळ आढळलेल्या या मृतदेहावर जागोजागी अनन्वित छळाच्या खुणा दिसत आहेत. पाकव्याप्त काश्मीरमधील नीलम खोऱ्यातील रहिवासी असणारा मुजाहिद याचे तीन दिवसांपूर्वी अज्ञात व्यक्तींकडून अपहरण झाले होते. या घडामोडीने आयएसआय या पाकिस्तानी गुप्तचर संस्थेमध्ये खळबळ उडाली आहे. त्याचे अपहरण आणि हत्या कोणी केली, याबाबत अद्यापही काही स्पष्ट होऊ शकलेले नाही. अद्याप कोणत्याही गटाने या घटनेची जबाबदारी स्वीकारलेली नाही.
हे ही वाचा:
जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!
भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!
महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!
भारताला हव्या असणाऱ्या आणि पाकिस्तानमध्ये आश्रय घेतलेल्या अनेक व्यक्तींच्या गेल्या काही महिन्यांत हत्या झाल्या आहेत. त्यामध्ये आता मुजाहिदची भर पडली आहे.१० फेब्रुवारी, २०१८ रोजी जम्मू आणि काश्मीरमधील लष्कराच्या तळावर सशस्त्र दहशतवाद्यांनी जोरदार हल्ला केला होता. एके ५६ रायफल, ग्रेनेड लाँचर्स आणि मोठ्या प्रमाणावर दारुगोळा घेऊन हल्ला केलेल्या दहशतवाद्यांपैकी सुरक्षा दलाने तिघांचा खात्मा केला होता. या हल्ल्यात सहा महिला आणि लहान मुलांसह १० जण जखमी झाले होते. जखमींपैकी एक महिला गर्भवती होती. त्यानंतर तिने एका गोंडस मुली जन्म दिला.