भारतातील भाताच्या वाणाचे संवर्धन होणार आहे. भारतात जवळपास लाख- दोन लाखांहून अधिक भाताचे वाण होते. त्यापैकी सध्या केवळ १५० ते २०० वाण शिल्लक आहेत. अशाच काही नामशेष होण्याच्या मार्गावर असलेल्या तब्बल ८८ वाणांचे संवर्धन केले जाणार आहे. या वाणांचे खेड तालुक्यातील सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीमध्ये संवर्धन केले जात आहे.
भारतातील हे भाताचे वाण टिकले पाहिजेत, वाढले पाहिजेत यासाठी शाळेच्या वतीने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये जनजागृती केली जाते. भारतात जवळपास लाख- दोन लाखांहून अधिक भाताचे वाण होते. त्यापैकी सध्या केवळ १५० ते २०० वाण शिल्लक आहेत. देशातील प्रत्येक प्रदेशात त्या- त्या भागातील माती, त्या परिसराच्या गरजेनुसार भाताचे वाण विकसित झाले होते. यामध्ये हाडाच्या मजबुतीसाठी, थंडीसाठी, उन्हाळ्यात खाण्यासाठी, अॅन्टी डायबेटिस, अॅन्टी कॅन्सर असे प्रचंड औषधी गुणधर्म असलेले, तर काही भात ज्यामध्ये प्रचंड पोषणमूल्य असल्याने केवळ राजे-महाराज व सैनिकांनी खाण्यासाठी राखीव ठेवलेले भाताचे वाण आपल्या देशात होते. मात्र, आता शिल्लक असलेल्या वाणांपैकी ८८ वाणांचे संवर्धन होणार आहे.
या वाणांचे संवर्धन आणि त्यांच्या वाढीसाठी सह्याद्री स्कूल प्रयत्न करत आहे. गेल्या काही वर्षांत निसर्गाचा लहरीपणा, संकरित भाताच्या बियाण्यांच्या वाढलेल्या किंमती, खतांचा तुटवडा आणि मजुरीचा खर्च यामुळे भातशेतीला फारसे महत्त्व दिले जात नाही. या पार्श्वभूमीवर सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीत या दुर्मीळ भाताच्या वाणाचे संवर्धन केले जात आहे.
खेड तालुक्यात चासकमान धरणाच्या कुशीत वसलेल्या सह्याद्री स्कूलच्या नैसर्गिक शेतीत अशा अनेक पारंपरिक व देशी पिकांच्या विविध वाणांचे संवर्धन केले जाते. सह्याद्री स्कूल देशी बियाणे संवर्धक व समन्वयक दीपा मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या अनेक वर्षांपासून येथे नैसर्गिक शेती केली जाते. तब्बल ६५ एकर परिसरात ही निवासी शाळा , येथे शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांना पौष्टिक, शुध्द आणि विषमुक्त अन्न मिळावे म्हणून शाळेच्या परिसरातच मोठ्या प्रमाणात नैसर्गिक शेतीचे अनेक प्रयोग केले जातात. ‘पुढारी’ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.
हे ही वाचा:
जरांगे पाटील यांच्याविरोधात भुजबळांनी दंड थोपटले!
भारताविरुद्धचा पराभव लागला जिव्हारी; संपूर्ण श्रीलंका क्रिकेट बोर्ड बरखास्त
‘अतिमागास वर्गाला कमी लेखण्यासाठी बिहारच्या जातीय सर्वेक्षणात फेरफार’!
महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!
इंद्रायणी, बासमती, कोलम, आंबेमोहर, मुणगा, तुळश्या, नांदेड हिरा, पार्वती चिनोर, साईभोग, चकावह, जीर खरपूड, तळोदी रेड, नवारा ब्लॅक हस्क, नवारा ब्लॅक गोल्ड, जोधळी जिलगा, तुळश्या, पुसा, कसबाई, ढवळ, घनसाळ, अशी शेकडो नावे आणि भाताचे प्रकार सह्याद्री शाळेच्या नैसर्गिक शेतीत आहेत.