सोशल मीडियावर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ सर्वाधिक चर्चेतील राजकीय नेत्यांपैकी एक आहेत. हॅशटॅग ट्रॅकिंग टूल ‘ट्वीट बाइंडर’ने रविवारी याला दुजोरा दिला. त्यांनी जाहीर केलेल्या नवीन आकडेवारीनुसार, ऑक्टोबर २०२३मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यानंतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर योगी यांच्या अकाऊंटची सर्वाधिक चर्चा झाली.
ही आकडेवारी १ ऑक्टोबर ते ३१ ऑक्टोबरपर्यंतची आहे. ट्वीट बाइंडरचा हॅशटॅग ऍनॅलिटिक्स आणि फॉलोअर ट्रॅकिंग टूल आहे. हे ट्विटर हॅशटॅग ऍनॅलिटिक्स आणि ट्विटर मॉनिटरिंगसाठी डिझाईन केले आहे.
राहुल गांधींच्याही पुढे योगी
ट्वीच बाइंडरच्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबरमध्ये ‘एक्स’वर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या खात्यावर सर्वाधिक चर्चा झाली. त्यानंतर मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा क्रमांक लागतो. लोकप्रियतेच्या बाबतीत योगी हे राहुल गांधींपेक्षा कितीतरी पुढे आहेत. तर, एकूण आकडेवारी पाहिल्यास पंतप्रधान मोदी, क्रिकेटपटू विराट कोहली आणि दक्षिणेचा अभिनेता विजय हे योगी यांच्या पुढे आहेत. तर, क्रिकेटपटू रोहित शर्मा, अभिनेता सलमान खान, राहुल गांधी, शाहरुख खान आणि अक्षय कुमारसारखे सेलिब्रिटीही योगी यांच्या मागे आहेत.
हे ही वाचा:
महादेव बेटिंग ऍपवर केंद्र सरकारची बंदी!
‘ओलिसांच्या सुटकेशिवाय युद्धविराम नाही’
नक्षलग्रस्त भागातील जवानाची स्वप्नपूर्ती; अबूझमाड मल्लखांब ऍकॅडमी ‘इंडियाज गॉट टॅलेंट १०’ची विजेती
राजस्थानमध्ये बस रेल्वे रुळावर पडल्याने चार जण ठार तर २४ जण जखमी!
देश-विदेशांतही योगींची धूम
योगी यांचे चाहते केवळ भारतातच नाहीत तर, शेजारी देश पाकिस्तानसह ऑस्ट्रेलिया, इस्रायल, अमेरिका आणि इंग्लंडमध्येही आहेत. देशातील पाच राज्यांत सुरू असलेल्या विधानसभा निवडणूक प्रचारात पंतप्रधान मोदीनंतर योगी आदित्यनाथ यांनाच मागणी आहे.