25 C
Mumbai
Tuesday, November 26, 2024
घरदेश दुनियाइस्रायलकडे जाणारी प्रवासी वाहतूक एअर इंडियाकडून स्थगित

इस्रायलकडे जाणारी प्रवासी वाहतूक एअर इंडियाकडून स्थगित

युद्धाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

Google News Follow

Related

इस्रायल आणि दहशतवादी संघटना हमास यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढतचं असून युद्ध शमण्याची चिन्हे दिसत नाहीत. हमासने या युद्धाला सुरुवात केली असून आता प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून सातत्याने गाझा पट्टीवर हवाई हल्ले होत आहेत. यात मोठ्या प्रमाणात वित्त आणि जीवितहानी होत आहे. इस्रायलची राजधानी असलेल्या तेल अवीव शहरातही याचे पडसाद उमटत आहेत. परिणामी या तणावाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने मोठा आणि महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

युद्धाच्या पार्श्वभूमीवर एअर इंडियाने तेल अवीवला जाणारी नियोजित उड्डाणे काही काळासाठी स्थगित केली आहेत. या विमान कंपनीने ७ ऑक्टोबरपासून तेल अवीवला जाण्यासाठी आणि तेथून भारतात येणारी नियोजित उड्डाणे रद्द केली होती. एअरलाइनच्या प्रवक्त्याने दिलेल्या माहितीनुसार, तेल अवीवची उड्डाणे ३० नोव्हेंबरपर्यंत स्थगित करण्यात आली आहेत. साधारणपणे, दिल्लीतून तेल अवीवला जाण्यासाठी आठवड्यातून पाच वेळा उड्डाणे असतात. सोमवार, मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवारी अशी ही सेवा असते. परंतु, आता वाढत्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर ही उड्डाणे रद्द करण्यात आली आहेत.

हे ही वाचा:

पुण्यातील इसिस टेरर मॉड्यूल प्रकरणात सात आरोपींविरुद्ध एनआयएकडून आरोपपत्र दाखल

‘विराट’ वाढदिवस, सचिनच्या वनडे शतकांच्या विक्रमाशी बरोबरी

दोन फ्लॅट १५० खरेदीदारांना विकले, बेंगळुरूच्या बिल्डरला अटक!

इस्रायल-हमास वाद जुना आहे पण आता तो शिगेला पोचला!

दरम्यान, इस्रायलमध्ये अडकेलेल्या भारतीयांना मायदेशी परत आणण्याकरता सरकारकडून ऑपरेशन अजय राबविण्यात आले होते. गेल्या महिन्यात ऑपरेशन अजय अंतर्गत हजारो भारतीय मायदेशी परतले. ऑपरेशन अजयसाठी एअर इंडियाने चार्टर्ड सेवा पुरवली होती. पुढील ४८ तासांत इस्रायल लष्कर गाझा पट्टीवर आक्रमण करणार असल्याचे वृत्त इस्रायल माध्यमांनी दिले आहे. त्यामुळे अधिक सतर्कता बाळगण्यात येत आहे. तसंच, दक्षिण आणि उत्तर गाझा असे गाझा पट्टीचे दोन भाग झाल्याचेही वृत्तांमध्ये आहे. त्यामुळे येत्या काळात युद्धाचा भडका उडण्याची शक्यता आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
198,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा