इस्रायलवर हल्ला करण्यासाठी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीमध्ये भुयारांचे जाळे निर्माण केले आहे. तेथूनच त्यांचे इस्रायलवरील हल्ल्यांची सूत्रे फिरवली जात आहेत. त्यामुळे इस्रायलच्या लष्कराने आता या भुयारांत लपलेल्या दहशतवाद्यांना लक्ष्य करण्यासाठी क्रूर अशा श्वानांच्या फौजेचे साह्य घेतले आहे.
इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतान्याहू यांच्या कार्यालयाचे प्रवक्ते ओफिर गेंडेलमेन यांनी ‘एक्स’वर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. त्यात एक भुयार दिसत आहे. ज्यामध्ये काळाकुट्ट अंधार आहे. या भुयारात एक श्वान वेगाने धावत आहे. त्याच्या पाठीवर कॅमेरा बसवण्यात आला आहे. कॅमेऱ्यामध्ये असे दिसून येत आहे की, या कुत्र्याच्या पुढे हमासचा एक दहशतवादीही धावतो आहे. काही वेळातच हा कुत्रा हमासच्या दहशतवाद्यांवर झडप घालतो आणि त्याला जमिनीवर पाडतो. हमासचा दहशवादी जोरजोरात मदतीसाठी पुकारा करतो.
हे ही वाचा:
बुडत्याचा पाय खोलात, आता ड्रग्ज प्रकरणीही आरोप
मोदी सरकारचा मोठा निर्णय; मोफत रेशन योजनेला पाच वर्षांची मुदतवाढ
आयएएस बनण्याची गोष्ट… सहा गोळ्या लागूनही जिवंत!
‘जगभरात वादळी परिस्थिती; भारताला नरेंद्र मोदी यांच्यासारख्या पंतप्रधानांची गरज’
मात्र हा कुत्रा त्याला चावत राहतो. बेन्जामिन यांच्या कार्यालयाच्या प्रवक्त्यांनी हा व्हिडीओ जाहीर करून तो गाझा पट्टीमधील असल्याचा दावा केला आहे. ‘इस्रायल संरक्षण दलाचे क्रूर श्वान हमासच्या दहशतवाद्यांचा पाठलाग करून त्यांना ठार करत आहेत,’ असे त्यांनी यात नमूद केले आहे.
युद्धाच्या सुरुवातीला मोठमोठ्या इमारतींना लक्ष्य करणाऱ्या इस्यालच्या सैनिकांनी आता त्यांच्या रणनितीमध्ये बदल केला आहे. त्यांनी आता हमासच्या दहशतवाद्यांनी आश्रय घेतलेल्या भुयारांना लक्ष्य केले आहे. या भुयारांवर हल्ला करण्यासाठी ते कोणत्याही थराला जात आहेत. मग ती भुयारे रुग्णालयाखाली असोत की, शाळेच्या इमारतीखाली… त्या सर्वांना लक्ष्य केले जात आहे.