23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरक्राईमनामाबनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला नावावर केला

बनावट कागदपत्रांच्या आधारे ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला नावावर केला

पोलिसांकडून आरोपीचा शोध सुरू

Google News Follow

Related

कल्याण पश्चिम भागात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पदस्पर्शाने पावन असा ऐतिहासिक दुर्गाडी किल्ला आहे. या किल्ल्याची बनावट कागदपत्रे तयार करून नावावर केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. किल्ल्याची जागा नावावर करणाऱ्या व्यक्ती विविध कलमानुसार महात्मा फुले चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे खळबळ उडाली आहे. सुयश शिर्के (सातवाहन) असे गुन्हा दाखल झालेल्या आरोपीचे नाव आहे.

सुयश शिर्के याने कल्याण मधील ऐतिहासिक दुर्गाडी किल्लाच्या जागेचे वंशज असल्याचं दाखूवन बनावट कागदपत्रांच्या आधारे स्वतःच्या नावे केला. मात्र, जागा विक्री होण्यापूर्वीच हा प्रकार कल्याण मंडळ अधिकारी असलेल्या महिला अधिकारी प्रीती घुडे यांच्यामुळे उघडकीस आला. त्यानंतर घुडे यांनी २ नोव्हेंबर रोजी सुयश शिर्के यांच्यावर भादंवि कलम ४२०, ४६५, ४६६, ४६८, ४७१, ७७३ प्रमाणे गुन्हा दाखल केला आहे.

माहितीनुसार, सुयश शिर्के याने १२ सप्टेंबर २०२२ रोजी किल्ल्याची जागा आपल्या नावाने करण्यासाठी ना हरकत दाखल्यासाठी अर्ज दिला होता. या अर्जात त्याने शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार असल्याचा उल्लेख करून कल्याण तहसील कार्यालयातील पाच ते सात कागदपत्रांवर शिक्के आणि अधिकाऱ्यांच्या बनावट सह्या असलेले कागदपत्रं अर्जसोबत जोडले होते. या जागेचे प्रकरण ऐतिहासिक किल्ल्याविषयी असल्याने मंजुरीसाठी जिल्हाधिकारी कार्यलयात पाठविण्यात आले होते.

दरम्यानच्या काळात किल्ल्याची पडझड झाल्याने दुरुस्ती करावी म्हणून स्थानिक बाजारपेठ पोलीस ठाण्याच्या वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी ठाणे जिल्हा अधिकारी कार्यलयाशी पत्र व्यवहार करून किल्ल्या संदर्भात लेखी माहिती मागवली असता, सदरची जागा शिर्के (सातवाहन) राजाचे वंशज आणि वारसदार यांची असल्याने त्यांच्याकडून दुरुस्तीची परवानगी द्यावी असे पोलिसांना कळविण्यात आले.

हे ही वाचा:

पुण्यात ‘एनआयए’कडून दहशतवादी मोहम्मद आलमला अटक!

अब की बार…३२५ पार

मसाले आणि लोणचे किंग अतुल बेडेकर यांचे वयाच्या ५६ व्या वर्षी निधन!

पाकिस्तानकडून अफगाणिस्तानी निर्वासितांवर क्रूर अत्याचार!

दुसरीकडे कल्याण मंडळ अधिकारी कार्यलयात या किल्ल्याच्या जागे संदर्भात २४ फेब्रुवारी २०२३ रोजी दस्तऐवज तपासणी दरम्यान कल्याण तहसीलदार कार्यालयाच्या नावाने बनावट पत्रासह अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी केलेले दस्तऐवज आढळून आल्याने हा धक्कदायक प्रकार उघडकीस आला. त्यानंतर २ नोव्हेंबर रोजी कल्याण तहसीलदार कार्यालयातील मंडळ अधिकारी प्रीती घोडे यांच्या तक्रारीनंतर कल्याण महात्मा फुले पोलीस ठाण्यात सुयश शिर्के नामक व्यक्तीवर फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा