भारताने वनडे क्रिकेट वर्ल्डकपमधील आपल्या सातव्या सलग विजयाची नोंद करताना श्रीलंकेचा अक्षरशः धुव्वा उडविला. क्रिकेट आहे की गंमत चालली आहे, अशा शब्दांत प्रेक्षकांनी या सामन्याची खिल्ली उडविली. भारताने प्रथम फलंदाजी करताना केलेल्या ८ बाद ३५७ धावांना उत्तर देताना श्रीलंकेचा डाव अवघ्या ५५ धावांत आटोपला. भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमी या विजयाचा शिल्पकार ठरला. त्याने १८ धावा देत श्रीलंकेचे पाच फलंदाज टिपले आणि भारताला तब्बल ३०२ धावांनी विजय मिळवून दिला. य़ा विजयासह भारताच्या खात्यात १४ गुण जमा झाले आहेत.
खरे तर भारत या सामन्यात नाणेफेक हरला होता. श्रीलंकेने मात्र प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले. त्यांचा तो निर्णय महागात पडला. शुभमन गिल (९२), विराट कोहली (८८), श्रेयस अय्यर (८२) यांनी केलेल्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने ८ बाद ३५७ धावा केल्या. विराटची ४९ वे वनडे शतक ठोकून सचिन तेंडुलकरची बरोबरी करण्याची संधी मात्र हुकली. श्रीलंकेच्या मधुशनकाने ८० धावा देत भारताचे ५ फलंदाज टिपले.
हे ही वाचा:
घर जाळणारे बिगरमराठे समाजकंटक; जीव वाचवणारे मराठा कार्यकर्ते
बँक कर्जाचे पैसे जेटच्या संस्थापकांनी पत्नी, मुलाच्या माध्यमातून इतरत्र वळवले
‘एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधून अढी दूर करा’!
श्रीलंकेला मात्र हे आव्हान पेलवले नाही. श्रीलंकेला आपल्या डावाच्या प्रारंभापासूनच सूर गवसला नाही. पहिल्या ३ धावांतच त्यांचे चार फलंदाज माघारी परतले होते. त्यानंतरही डाव सावरण्याची कोणतीही चिन्हे दिसत नव्हती. १४ धावांत त्यांचा अर्धा संघ माघारी परतला होता. तर धावांचे अर्धशतक लागण्यापूर्वी ९ फलंदाज माघारी परतले होते. ही दारुण अवस्था श्रीलंकेच्या क्रिकेटची अवस्था पुरती स्पष्ट करत होते.
मोहम्मद शमी याने वनडे क्रिकेटमध्ये ५ बळी घेतले आणि वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक वेळा पाच बळी घेणारा तो भारताचा पहिला फलंदाज ठरला. त्याने चार वेळा ही कामगिरी केली आहे. जवागल श्रीनाथने हा विक्रम केला होता, त्याला शमीने मागे टाकले. श्रीलंकेच्या फलंदाजांपैकी १४ धावा या सर्वोत्तम ठरल्या. १९.४ षटकांतच श्रीलंकेचा डाव आटोपला.