30 C
Mumbai
Saturday, October 26, 2024
घरविशेषसावरकर स्मारकाच्या वास्तूत एक मुख्यमंत्री खरे बोलला होता; पण नंतर त्याने भूमिका...

सावरकर स्मारकाच्या वास्तूत एक मुख्यमंत्री खरे बोलला होता; पण नंतर त्याने भूमिका बदलली!

Google News Follow

Related

तटस्थ पत्रकारिता म्हणजे काय? सध्याच्या परिस्थितीवर राज्यात चाललेल्या राजकारणाविषयी आपले परखड मत मांडून जनतेची दिशाभूल न करता सविस्तर माहिती देणे हेच आपले कर्तव्य. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या या पवित्र वास्तूत उभे राहून बोलणे हे अत्यंत अभिमानाचे आहे कारण इथे माणूस खोटे बोलत नाही. न्यूज डंका सारख्या माध्यमांच्या सुरुवातीमुळे माध्यमांचं बदलत चाललेलं रूपडं पाहायला मिळत आहे. अशा माध्यमांचा उगम व्हावा तो निरंतन चालावा यासाठी आपल्या स्वतःच्या खिश्यातुन पैसे काढून देणारी माणसे इथे असल्यामुळे असा विषय मांडण्यासाठी अशा माध्यमांची गरज असल्याचे एनलायजरचे सुशील कुलकर्णी यांनी सांगितले.

 

‘न्यूज डंका’च्या ‘मोदी-३’ या दसरा-दिवाळी विशेषांकाचा प्रकाशन सोहळा बुधवार, १ नोव्हेंबर रोजी दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार भाऊ तोरसेकर, ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी, ‘न्यूज डंका’चे सल्लागार संपादक आमदार अतुल भातखळकर, मुख्य संपादक दिनेश कानजी व्यासपीठावर उपस्थित होते. यावेळी सुशील कुलकर्णी यांनी आपली परखड मते मांडली.

 

स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकाच्या या पवित्र वास्तूत उभा राहून बोलताना मला प्रचंड अभिमान वाटतो. कारण माणूस इकडे आला की खरे बोलतो. या वास्तूत आल्यावर एक मुख्यमंत्री म्हणाले होते, या देशाचे आद्यक्रांतिकारक स्वातंत्र्यवीर सावरकर होते. पुढे जाऊन त्यांची भूमिका बदलली; पण इकडे ते खरे बोलले हे महत्त्वाचे, असा टोला ज्येष्ठ पत्रकार सुशील कुलकर्णी यांनी शरद पवारांना लगावला. उपमुख्यमंत्री अजित पवार याना डेंग्यूची लागण झाल्यामुळे या कार्यक्रमाला ते येऊ शकले नाहीत.मात्र ते जर आले असते तर बरे झाले असते आंणि त्यांना ही समजले असते की, ‘न्यूज डंकाची’ सुरुवात तसेच इतर माध्यमांची सुरुवात झाल्यामुळे बदलेलं माध्यमांचं रूपडं त्यांच्या लक्षात आलं असत.

 

त्यामुळे ‘न्यूज डंका’सारख्या अशा माध्यमांचा उगम व्हावा तो निरंतन चालावा यासाठी आपल्या स्वतःच्या खिश्यातुन पैसे काढून देणारी माणसे इथे असल्यामुळे असा विषय मांडण्यासाठी अशा माध्यमांची गरज झाली आहे.त्यामुळे आता हे चालवणं आमचं काम नाही तर आता हे चालवणे एक कर्तव्याचा भाग असल्याचे त्यांनी सांगितले. तटस्थ पत्रकारिता म्हणजे काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे. माझ्या मते तटस्थ पत्रकारिता म्हणजे हिंदुत्वाला शिव्या घालणे, नरेंद्र मोदींचा दुष्प्रचार करणे, उजव्या विचारसरणीच्या लोकांना दुषणे देत राहणे, मुस्लिमांचे लांगुलचालन करणे. तटस्थ पत्रकार काँग्रेसचे खासदार होऊ शकतात, तरीही ते स्वतःला तटस्थ म्हणवतात. त्यामुळे असले पत्रकार मला हल्ली नपूंसकासारखे वाटतात, असे ते म्हणाले.

हे ही वाचा:

‘एकमेकांशी मोकळ्या मनाने संवाद साधून अढी दूर करा’!

२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार

काही तटस्थ पत्रकारिकेच्या संपादकांनी मुंबईत घरे बांधली, ठिक-ठिकाणी जागा घेतल्या,त्यामुळे आता गायकीच्या घराण्यासारखे पत्रकारितेची घराणे सुरु झाली.यामध्ये छोटे-छोटे पत्रकारांचे किराणा घराणे सुरु झाले, म्हणजे त्यांच्या घराचे किराणा माल कोणीतरी भरून देतं.काही आयफोन घराणे,काही म्हाडा घराणे झाली.त्यामुळे यांच्या तटस्थ पत्रकारितेच्या धंद्यामुळे आम्हाला याची सूत्र हाती घ्यावी लागली आणि आता ‘न्यूज डंका सारखे एक ब्रँड तयार झाले आहेत.कारण ‘न्यूज डंका’, एनलायझर,प्रतिपक्ष,डीजी ९ आकार,अशा प्रकारचे कितीतरी चॅनेल आले आणि ते चालत आहेत. याच मुख्य कारण म्हणजे लोकांना आता इथे खरं बघायला मिळतं, अशा शब्दांत त्यांनी बदललेल्या मीडियाची कानउघाडणी केली.

 

आता जग बदलत चाललेलं आहे.त्याप्रमाणे आपण सुद्धा आता बदलले पाहिजे .बदल स्वीकारत असताना नुसतं मोदी-मोदी काय लावले आहे असे अनेक जण बोलतात.त्यांना मी सांगू इच्छितो की, प्रसार माध्यमांच्या आरशा मध्ये पहा, रोजच्या दैनिकांच्या आरशामध्ये पाहाल तर फक्त मोदी दिसतात.तर मोदी का हवे आहेत याचे एक उदाहरण देतो ते म्हणजे, पंतप्रधान नरेंद्र मोदी चीनच्या बॉर्डर लाईन वर गेले होते.ते तिथे जाऊन राहिले, त्या कामगारांसोबत जेवले.मोदींनी जनसंघाचे प्रचारक म्हणून काम केल्यामुळे हे सर्व घडत असल्याचे ते म्हणाले.

माझ्या लोकांपर्यंत पोहचायचे असेल तर ते जसे असतात तसेच मला सुद्धा राहील पाहिजे, ते जे खातात तेच खाल्ले पाहिजे या भावनेचे मोदी आहेत.मोदींनी जनसामान्य लोकांचे अनुभव जाणलेत, ते पाहिलं आहे तेव्हा ते आज इथपर्यंत पोहचले आहेत.राष्ट्राला स्वाहा करण्याची वृत्ती नसून राष्ट्राला राष्ट्रापती स्वतःला समर्पित करण्याची वृत्ती घेऊन निघालेला पंतप्रधान आम्हाला चार वेळा मिळाला तरी हरकत नसल्याचे सुशील कुलकर्णी यांनी सांगितले. पंतप्रधान मोदींमुळे आता आपला देश पुढे जात आहे.आपल्या देशाची ताकद एवढी वाढली आहे की, भारताचा शब्द मोडायचा देखील दुसरे देश आता विचार करतात.

तटस्थ ची एक गंमत सांगतो, असे म्हणत सुशील कुलकर्णी म्हणाले की, ती गंमत म्हणजे पंतप्रधान मोदी यायच्या अगोदर आपला भारत देश सुद्धा तटस्थ होता.तो म्हणजे, काही झालं तरी आम्ही ना यांचे ना आम्ही दुसऱ्यांचे तर आम्ही फक्त तटस्थ.मात्र, आता भारताची अशी एक वेगळी बाजू झाली आहे ती म्हणजे आम्ही ना अमेरिकेचे ना इंग्लंडचे तर आम्ही फक्त आमचे.हा बदल आहे.

होय आम्ही आहोत गोदी मीडिया

आम्हाला गोदी मीडिया म्हणता, मोदींच्या गोदीत बसला असे म्हणता, तर हो आम्ही गोदी मीडिया आहोत आणि आम्ही मोदींच्या गोदीत बसलो आहोत.याला कारण म्हणजे मोदींची गोदी आम्हाला आमच्या आईची गोदी वाटते म्ह्णून आम्ही त्यांच्या गोदीत बसतो. ही आई म्हणजे आपल्या लेकराला कधी खाली पडू देणार नाही अशी मोदींची गोदी आहे.हा देश नीट राहील तर आम्हीही जगू असा विश्वास आमच्या मनामध्ये आहे. त्यामुळे असा पंतप्रधान भारताला पहिल्यांदा मिळाला आहे.तुम्ही म्हणत असाल तर आम्ही गोदी मीडिया आहोत कारण आम्हाला देशाची वाटोळं करणारी,देशातील लोकांना असुरक्षित वाटणारी पत्रकारिता करायची नाहीये.उद्योग करणे म्हणजे पत्रकारिता नाहीये तर या व्यवस्थेवर,देशावर त्या परंपरेवर विश्वास वाटेल अशी पत्रकारिता करावी लागणार असल्याचे ते म्हणाले. तसेच मोदी तर पुढे येणार आहेतच या विश्वासात न राहता मोदी येण्यासाठी सगळे हिंदू मतदानाला जाणार आहेतच यावर अधिक विश्वास ठेवावा. जेवढा अधिक हिंदू मतदान करेल तेवढे ते लाभदायक ठरेल असे ते म्हणाले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
185,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा