उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इस्रायलने गाझा पट्टीमध्ये पुकारलेल्या युद्धाचे कौतुक केले आहे. ‘इस्रायलचे गाझा पट्टीमधील हल्ला म्हणजे तालिबानी मानसकितेला चिरडण्याच्या दिशेने टाकलेले पाऊल आहे,’ अशी प्रतिक्रिया दिली आहे.
आगामी राजस्थान विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजस्थानमधील प्रचारसभेत संबोधित करताना ते बोलत होते. ‘तालिबानचा निःपात बजरंगबलीची गदाच करू शकते,’असे ते या प्रचारसभेत म्हणाले.
‘तुम्ही पाहात आहात ना, इस्रायल यावेळी गाझामध्ये तालिबानी मानसिकतेला चिरडण्याचे कसे काम करत आहे. अगदी बारकाईने, अचूक नेम धरून, व्यवस्थित लक्ष्य करून त्यांना टिपले जात आहे,’ असे योगी प्रचारसभेत सांगत होते.
हे ही वाचा:
२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार
कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण
हमासचे ३०० तळ आणि भुयारांचे जाळे उद्ध्वस्त; हमासचा कमांडर ठार
ड्रग्स माफिया अली असगर शिराझी संबंधिताभोवती ईडीचा फास
७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांनी गाझा पट्टीवरून इस्रायलवर केलेल्या हल्ल्यात सुमारे १४०० इस्रायली नागरिक मारलेगेले होते. तर, हमासच्या दहशतवाद्यांनी सुमारे २३९ जणांचे अपहरण करून ओलिस ठेवले होते. त्यामुळे संतप्त झालेल्या इस्रायलने तातडीने गाझा पट्टीवर हल्ले करण्यास सुरुवात केली. या हल्ल्यात आतापर्यंत सुमारे साडेआठ हजार नागरिकांना जीव गमवावा लागला असल्याचे हमासच्या आरोग्य मंत्रालयातर्फे सांगण्यात आले आहे.