32 C
Mumbai
Friday, October 18, 2024
घरक्राईमनामाकोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

कोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या पोलिसालाच जमावाने घेरून केली मारहाण

लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल

Google News Follow

Related

वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका पोलिसावर जमावाने हल्ला करून त्याला मारहाण केल्याची घटना उत्तर प्रदेशातील महोबा जिल्ह्यात सोमवारी घडली. हा पोलिस आणि त्याचे सहकारी वाहतूककोंडी सोडवण्याचा प्रयत्न करत होते.
उत्तर प्रदेशात पोलिस निरीक्षक असणारे राम अवतार यांना काही जमाव लाथाबुक्क्यांनी मारहाण करत असल्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. ही घटना महोबा जिल्ह्यातील पानवारी भागात घडली.

एक १३ वर्षीय मुलगा सायकलवरून शाळेतून घरी जात असताना एका बसने दिलेल्या धडकेत त्याचा मृत्यू झाला होता. या घटनेनंतर या मुलाचे कुटुंबीय, काही स्थानिक नागरिक यांनी रस्त्यावरच मुलाचा मृतदेह आणून बसचालकावर कठोर कारवाई करण्याची आणि नुकसान भरपाईची मागणी केली. त्यामुळे रस्त्यावर वाहतूककोंडी झाली होती. याबाबतची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक राम अवतार त्यांच्या सहकाऱ्यांसह ही कोंडी सोडवण्यासाठी त्वरित घटनास्थळी दाखल झाले. मात्र जमावाने त्यांच्यावर लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. पथकातील अन्य तीन पोलिसांनी घटनास्थळावरून पलायन केले. त्यामुळे राम अवतार हे एकटेच जमावाच्या तावडीत सापडले.

हे ही वाचा:

वानखेडे स्टेडियम वर्ल्डकपदरम्यान आतषबाजीने रंगणार नाही

लिफ्टमध्ये कुत्र्यावरून वाद; निवृत्त आयएएस आणि दाम्पत्यात मारहाण

पंड्या संघात परतल्यावर बाहेर कोण जाणार?

‘वाघ, बिबळ्या, खवले मांजर, गेंड्यांच्या अवशेषांचा ८८ चिनी औषधांमध्ये वापर’

काही वेळानंतर उपविभागीय दंडाधिकारी आणि पोलिस उपअधीक्षक घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी जमावाला शांत केले. तसेच, त्यांनी पोलिस निरीक्षक राम अवतार यांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले. पोलिसांनी मारहाणप्रकरणात आतापर्यंत पाच जणांना अटक केली आहे. त्यातील दोघा आरोपींना पोलिस व्हॅनमधून ठाण्यात नेले जात असताना, त्यांनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. तर, त्यातील एकाने पोलिसाची पिस्तुल हिसकावली. त्यांनी पोलिसांवर गोळीबारही केला. मात्र पोलिसांनी लगेचच त्यांच्यावर प्रत्युत्तरादाखल गोळीबार करून त्यांना काबूत आणले. यात परशुराम आणि मोनू हे दोघे जखमी झाले आहेत. तर, दोन हवालदारांनाही किरकोळ जखमा झाल्या आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
183,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा