23 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरदेश दुनिया२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार

२० लाख अफगाणी नागरिकांना पाकिस्तान परत पाठवणार

अफगाणिस्तानी नागरिकांवर होणाऱ्या या कारवाईमुळे तालिबानी संतप्त

Google News Follow

Related

पाकिस्तान १ नोव्हेंबरपासून सुमारे २० लाख अफगाणी नागरिकांसह बनावट कागदपत्रांनी दाखल झालेल्या प्रवाशांची हकालपट्टी करणार आहे. बनावट कागदपत्रांनी दाखल झालेल्या प्रवाशांनी १ नोव्हेंबरपर्यंत हा देश सोडून निघून जावे, अन्यथा त्यांना अटक केली जाईल किंवा त्यांची हकालपट्टी केली जाईल, असे पाकिस्तान सरकारने ३ ऑक्टोबरला जाहीर केले होते. मात्र अफगाणिस्तानी नागरिकांवर होणाऱ्या या कारवाईमुळे तालिबानी संतप्त झाले आहेत. त्यांनी या कारवाईवर टीका केली असून अशा प्रकारे दोन्ही देशांमधील संबंध बिघडतील, असा इशारा दिला आहे.

पाकिस्तान सरकार या कारवाईवर ठाम आहे. निर्वासितांना व्यवस्थितरीत्या त्यांना देशात पाठवले जाईल, असे आश्वासन सरकारने त्यांना दिले आहे. निर्वासितांना टप्प्याटप्प्याने देशात पाठवले जाणार आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्यांना पहिल्यांदा अफगाणिस्तानात पाठवले जाईल. ते अफगाणिस्तानात पोहोचल्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी अधिकाऱ्यांनी तेथे होल्डिंग सेंटरची उभारणी केली आहे.

 

पाकिस्तानमध्ये सुमारे ४० लाख अफगाणी नागरिक राहतात. त्यातील सुमारे १७ लाख नागरिकांकडे कोणत्याही प्रकारची कागदपत्रे नाहीत. वाढता कट्टरवाद, पाकिस्तानभोवती फिरणारे आर्थिक संकट आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान या दोन देशांमधील बिघडत चाललेले संबंध या कारणांमुळे पाकिस्तान सरकारने हे पाऊल उचलले असल्याचे विश्लेषकांचे मत आहे.

हे ही वाचा:

‘अन्यथा आम्ही निर्णय घेऊ…’चा नेमका अर्थ काय ?

रोहित शर्माच्या यशस्वी कर्णधारपदाचे रहस्य

डाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात

फोन हॅकिंगप्रकरणी मंत्री वैष्णव यांनी विरोधकांना सुनावले

पाकिस्तानमधील आत्मघातकी हल्ल्यांमागे अफगाणिस्तान नागरिकांचा हात असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे. ‘जानेवारीपासून ते आतापर्यंत पाकिस्तानात २४ आत्मघातकी हल्ले झाले आहेत. त्यातील २४ पैकी १४ हल्ले अफगाणिस्तान नागरिकांनी केले होते.’ या दहशतवाद्यांना तालिबान सरकार सुरक्षित आश्रय देत असल्याचा आरोप पाकिस्तान सरकारने केला आहे. तसेच, या अफगाणी नागरिकांमुळे आपला रोजगार कमी होत चालल्याचा आरोप पाकिस्तानचे सर्वसामान्य नागरिक करत आहेत. त्यामुळे हे निर्वासित देश सोडून जात असल्याने पाक नागरिकही खूष आहेत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा