23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरराजकारणडाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात

डाव्यांची काँग्रेससोबतची चर्चा फिसकटली; तीन राज्यांत स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात

Google News Follow

Related

काँग्रेस पक्षासोबतची जागावाटपांबाबतची चर्चा फिसकटल्याने राजस्थान, छत्तीसगढ आणि मध्य प्रदेशात आता सीपीआय आणि सीपीएम हे पक्ष स्वतंत्रपणे निवडणूक रिंगणात उतरणार आहेत.

सीपीएम (माकप) राजस्थानमध्ये १७, छत्तीसगढमध्ये तीन आणि मध्य प्रदेशात चार जागा लढतील. तर, सीपीआय छत्तीसगढमध्ये १६, राजस्थानमध्ये १२ आणि मध्य प्रदेशातील नऊ जागांवर उमेदवार उभा करण्याच्या तयारीत आहे.
तेलंगणामध्ये मात्र दोन्ही पक्षांमध्ये जागावाटपाबाबत अजूनही चर्चा सुरू आहे. येथे कदाचित दोन्ही पक्ष प्रत्येकी दोन-दोन जागांवर लढतील आणि याच निर्णयावर शिक्कामोर्तब होईल, असे मानले जात आहे.

जागावाटबाबत चर्चा फिसकटल्याने त्याचा काय परिणाम होईल, यावर सध्या तरी कोणीही बोलायला तयार नाही. जागावाटबाबत एकवाक्यता झाली असती तर चांगले झाले असते, अशी सावध प्रतिक्रिया माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी यांनी दिली.

‘इंडिया आघाडीच्या बहुतेक घटक पक्षांनी सन २०२४च्या लोकसभा निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून या आघाडीची स्थापना केली आहे. हे उद्दिष्ट आम्ही याआधीच जाहीर केले आहे. राज्यांतही हे व्हावे, अशी आमची इच्छा होती. कदाचित यासाठी आणखी चांगला समन्वय आणि सहकार्याची अपेक्षा आहे. याचा लाभ आम्हाला सन २०२४च्या निवडणूक प्रक्रियेदरम्यान होईल,’ असा विश्वास येचुरी यांनी व्यक्त केला. माकपच्या केंद्रीय समितीच्या बैठकीत तिन्ही राज्यांतील जागावाटपाची चर्चा फिसकटल्यावर स्वतंत्रपणे निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला होता.

हे ही वाचा.. 

लिफ्टमध्ये कुत्र्यावरून वाद; निवृत्त आयएएस आणि दाम्पत्यात मारहाण

पाकिस्तानला गोपनीय माहिती देणाऱ्याला राजस्थानमधून अटक

मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून दोन खासदारांनंतर आमदाराचा राजीनामा

मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा

सीपीआयचे राजा यांनीही काँग्रेसच्या मनोवृत्तीबाबत नाराजी व्यक्त केली. काँग्रेस पक्षाने इंडिया आघाडीतील छोट्या घटकपक्षांना सामावून घेण्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे, असे अधोरेखित करत काँग्रेसच्या अशा अवमानकारक भूमिकेमुळे भविष्यातील वाटाघाटी अवघड ठरू शकतात, असा सूचक इशारा दिला.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा