23.5 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषमराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा

मराठी नवउद्योजकांनी व्यावसायिक यशासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घ्यावा

मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांचा सल्ला

Google News Follow

Related

मराठी नवउद्योजकांनी व्यवसायात यशस्वी होण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा फायदा करुन घेणे गरजेचे आहे, असा सल्ला ‘अदील ग्रुप ऑफ सुपर मार्केट्स’चे अध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक मसालाकिंग डॉ. धनंजय दातार यांनी नुकताच येथे दिला. मुंबई मराठी साहित्य संघ तसेच डॉ. भालेराव आणि कुटुंबीय पुरस्कृत यंदाचा ‘मराठी यशवंत पुरस्कार’ साहित्य संघाच्या अध्यक्ष अचला जोशी यांच्या हस्ते देऊन डॉ. दातार यांना सन्मानित करण्यात आले. गिरगावमधील डॉ. अ. ना. भालेराव नाट्यगृहात झालेल्या या कार्यक्रमात ते बोलत होते.

हेही वाचा.. 

उत्तर गाझाच्या सीमेवर इस्रायली रणगाडे

लिओनेल मेस्सी आठव्यांदा ठरला ‘बॅलन डी’ओर’ चा मानकरी

मालमत्तेच नुकसान करणाऱ्यांवर गुन्हे दाखल करून अटक करण्याचे निर्देश

केजरीवाल यांना ईडीकडून समन्स

डॉ. दातार यांनी मुंबई मराठी साहित्य संघाच्या यंदाच्या ८८ व्या वर्धापनदिन कार्यक्रमात प्रमुख पाहुणे या नात्याने बीजभाषण केले. त्यामध्ये त्यांनी उद्योग क्षेत्रातील आपल्या यशस्वी वाटचालीचे गमक उलगडून सांगितले. ते म्हणाले, व्यावसायिक नवा असो, वा प्रस्थापित, तो एकाच चाकोरीने व एकाच मानसिकतेने वागत राहिल्यास लवकरच कालबाह्य होतो. परिवर्तन संसार का नियम है, हा मंत्र लक्षात ठेऊन आपल्या व्यक्तिमत्त्वापासून ते कार्यशैलीपर्यंत वेळोवेळी बदल करत गेल्यास आपण टिकून राहतो. मी हाच मंत्र अनुसरला. उद्योग सुरू करणे सोपे असते, पण तो सातत्याने फायद्यात ठेवणे हे अधिक आव्हानात्मक असते. व्यवसायात यश आणि विस्तारासाठी नवीन तंत्रज्ञान फार महत्त्वाचे ठरते. पूर्वी आमचीही दुकाने पारंपरिक पद्धतीने चालत, परंतु मी आजूबाजूच्या बदलत्या वातावरणाचा, ग्राहकांच्या नव्या अपेक्षांचा आणि तंत्रज्ञानातील बदलाचा कानोसा घेतला व स्वतःला व व्यवसायाला त्यानुसार आमूलाग्र बदलले. साध्या दुकानांचे रुपांतर सुपर स्टोअर्समध्ये केले, ग्राहकांना स्वतः वस्तू हाताळण्याचा व निवडण्याची मोकळीक मिळाली, त्यांचे बिलिंग संगणक व स्कॅनरच्या माध्यमातून वेगवान होऊ लागले. अबोल किंवा प्रसिद्धीविन्मुख राहून कधीही धंदा होत नसतो. बोलणाऱ्याची मातीही खपते, पण न बोलणाऱ्याचे मोतीही खपत नाहीत, ही म्हण कायम लक्षात ठेवली पाहिजे.

कार्यक्रमात डॉ. दातार यांच्या हस्ते चार साहित्य पुरस्कारांचे वितरण झाले. नामवंत लेखक रत्नाकर मतकरी यांच्या पत्नी प्रतिभा मतकरी यांना सहचारिणी पुरस्कार, लेखिका अनुराधा कुलकर्णी यांना चंद्रगिरी पुरस्कार, मिलिंद कीर्ती यांना रा. भि. स्मृत्यर्थ वैचारिक पुरस्कार व चित्रकार विजय बोधनकर यांना साहित्य पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. साहित्य संघाचे कार्यवाह अशोक बेंडखळे यांनी स्वागत केले, कार्याध्यक्ष उषा तांबे यांनी प्रास्ताविक केले तर प्रमुख कार्यवाह डॉ. अश्विनी भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा