पाकिस्तानवर ८ विकेट्सनी दणदणीत विजय मिळवून धक्का देणाऱ्या अफगाणिस्तानने आता माजी विश्वविजेत्या श्रीलंकेलाही धूळ चारली आहे. वर्ल्डकप क्रिकेट स्पर्धेतील या सामन्यात अफगाणिस्तानने सात विकेट्सनी विजय मिळवून बाद फेरीत प्रवेश करण्यासाठी जोरदार प्रयत्न सुरू केले आहेत. या विजयामुळे अफगाणिस्तान गुणतक्त्यात ५व्या क्रमांकावर असून पाकिस्तान मात्र सातव्या स्थानी आहे.
आता भारत १२ गुणांसह पहिल्या क्रमांकावर असून दक्षिण आफ्रिका दुसऱ्या स्थानी आहे. त्यांच्या खात्यात १० गुण आहेत. न्यूझीलंडच्या खात्यात ८ गुण असून ऑस्ट्रेलियानेही ८ गुणांपर्यंत मजल मारली आहे.
या सामन्यात श्रीलंकेने २४१ धावांपर्यंत मजल मारली होती पण त्याला उत्तर देताना अफगाणिस्तानने चिवट खेळाचे प्रदर्शन केले. त्यांनी ३ फलंदाज गमावून ही धावसंख्या पार केली. ओमरझाईने ७३, रेहमत ६२ आणि शाहिदी नाबाद ५८ यांनी आपल्या संघाच्या विजयात मोलाची कामगिरी बजावली.श्रीलंकेची मात्र बाद फेरीत प्रवेश करण्याची शक्यता आता मावळली आहे. कारण त्यासाठी त्यांना पुढील तिन्ही सामने मोठ्या फरकाने जिंकावे लागतील. त्यात भारत, बांगलादेश आणि न्यूझीलंड यांचा समावेश आहे.
हे ही वाचा:
ललित पाटील प्रकरणात ससूनमधील कैदी रुग्ण समितीच्या अध्यक्षांचा राजीनामा
राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांचे ‘वैभव’ ईडीच्या निशाण्यावर
केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास
केरळमधील बॉम्बस्फोटमालिकेचा २० सदस्य करणार तपास
अफगाणिस्तानच्या फझलहक फारुकीने ३४ धावांत ४ बळी घेतले आणि श्रीलंकेला २४१ धावांवर रोखले. श्रीलंकेच्या वतीने पाथुम निसंकाने ४६ धावांची खेळी केली. ही त्यांच्या संघातील सर्वोच्च खेळी होती. कुसल मेंडिस (३९), सादिरा समरविक्रमा (३६) यांनी त्यात भर घातली. महीश तीक्षणाने २९ धावांची खेळी केली. त्यामुळे श्रीलंकेली २४१ धावसंख्येपर्यंत मजल मारता आली. पण ही धावसंख्या बचावासाठी पुरेशी नव्हती. अफगाणिस्तानने ते दाखवून दिले. इब्राहिम झदरानच्या ३९ धावा, रेहमत शेखरची ६२ धावांची खेळी, हसमतुल्ला शाहिदी (५८) आणि अझमतुल्ला ओमरझाई (७३) या तिघांची अर्धशतके या जोरावर अफगाणिस्तानला हे तुलनेने सोपे लक्ष्य गाठता आले. विशेष म्हणजे अफगाणिस्तानने पहिल्या १० षटकात ५०, २० षटकांत १०० धावा करून आपल्या प्रशिक्षकांनी केलेल्या मार्गदर्शनानुसार कामगिरी केली.