परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी कतारमध्ये मृत्यूदंडाची शिक्षा सुनावण्यात आलेल्या आठ माजी नौदल अधिकाऱ्यांच्या कुटुंबियांची भेट घेतली आहे.या भेटी बाबत खुद्द परराष्ट्रमंत्र्यांनी सोशल मीडियावर ही माहिती दिली.कतारमध्ये अटकेत असलेल्या ८ भारतीयांच्या कुटुंबीयांची आज सकाळी भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले.
परराष्ट्र मंत्री पुढे म्हणाले की, हा विषय अत्यंत गंभीर आहे.बैठकीत सरकार या विषयाला अत्यंत महत्व देत आहे.त्यांच्या सुटकेसाठी सरकार सर्वतोपरी प्रयत्न करत राहील, असे आश्वासन आम्ही कुटुंबियांना दिले आहे.या समस्येवर कुटुंबांशी समन्वय साधला जाईल, असे त्यांनी आपल्या ट्विट मध्ये म्हटले आहे.
हे ही वाचा:
ललित पाटीलवर ससून रुग्णालयाच्या डीनची कृपा; मुक्काम वाढविण्यासाठी पत्रव्यवहार
दिल्लीमध्ये वाल्मिकी जयंतीदरम्यान गोंधळ; मशिदीजवळ लाठ्याकाठ्यांनी हल्ला
गुगल मॅपकडून ‘भारत’ आणि ‘इंडिया’ दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता
भारतीय नौदल अधिकारी २०२२ पासून तुरुंगातच
भारतीय नौदलाचे हे सर्व ८ माजी अधिकारी ऑगस्ट २०२२ पासून कतारच्या तुरुंगात आहेत. कतारने या सर्वांवर हेरगिरीचा आरोप करत त्यांना अटक करण्यात आली.त्यानंतर या आरोपावरून सर्वांना कतार न्यायालयाने फाशीची शिक्षा सुनावली आहे.
यामध्ये माजी भारतीय नौदलाचे अधिकारी कॅप्टन नवतेज सिंग गिल, कॅप्टन बिरेंद्र कुमार वर्मा, कॅप्टन सौरभ वसिष्ठ, कमांडर अमित नागपाल, कमांडर पूर्णेंदू तिवारी, कमांडर सुगुनाकर पकाला, कमांडर संजीव गुप्ता आणि नाविक रागेश यांचा समावेश आहे.तसेच कमांडर पूर्णांदू तिवारी हे राष्ट्रपती पुरस्काराने सन्मानित आहेत.या सर्वांना कतारच्या गुप्तचर संस्थेने ३० ऑगस्ट २०२२ रोजी दोहा येथून अटक केली होती.