23.4 C
Mumbai
Sunday, December 22, 2024
घरविशेषआंध्र प्रदेशमधील रेल्वे अपघाताला मानवी चूक कारणीभूत!

आंध्र प्रदेशमधील रेल्वे अपघाताला मानवी चूक कारणीभूत!

तपासातून माहिती आली समोर

Google News Follow

Related

आंध्र प्रदेशमधील विजयनगर जिल्ह्यात दोन रेल्वेगाड्यांच्या धडकेत आतापर्यंत नऊ जणांचा मृत्यू झाला आहे. या दरम्यान ईस्ट कोस्ट रेल्वे (ईसीओआर) विभागाने या रेल्वेअपघातामागील कारणांबाबत अंदाज व्यक्त केला आहे. विजयनगरमधील हा रेल्वेअपघात मानवी चुकीमुळे झाल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. यात सुमारे १४ जण मृत्युमुखी पडले असून ४० जण जखमी झाले आहेत. तर, अपघातानंतर विजयनगरमध्ये मदतकार्य आणि बचावमोहीम अजूनही सुरू आहे.

रेल्वेच्या ईसीओआर विभागाचे मुख्य प्रवक्ते बिस्वजीत साहू यांनी अपघातानंतर पत्रकारांना माहिती दिली. त्यांनी मानवी चुकीमुळे अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला आहे.विशाखापट्टणम-रायगादा रेल्वेने सिग्नल ओव्हरशूटिंग केल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. सिग्नल ओव्हरशूटिंगचा अर्थ लाल सिग्नल देऊनही कोणत्याही रेल्वेने थांबण्याशिवाय पुढे मार्गक्रमण करणे. या रेल्वेने लाल सिग्नल असूनही पुढे मार्गक्रमण केल्यानेच हा अपघात झाल्याचे प्रथमदर्शनी तपासात आढळून आले आहे.

हे ही वाचा:

दिल्लीमध्ये वाल्मिकी जयंतीदरम्यान गोंधळ; मशिदीजवळ लाठ्याकाठ्यांनी हल्ला

ललित पाटीलवर ससून रुग्णालयाच्या डीनची कृपा; मुक्काम वाढविण्यासाठी पत्रव्यवहार

भारत अभेद्य, इंग्लंडला नमवून सलग सहावा विजय

टीएमसी मंत्र्याच्या मुलीने शिकवणीतून कमावले ३ कोटींची रक्कम

घटनेची माहिती मिळताच बचावपथक घटनास्थळी ताबडतोब पोहोचले होते. मात्र वीजपुरवठा खंडित झाल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य पसरले होते. त्यामुळे बचावपथकांनी स्वतःकडील मोबाइल फोनच्या प्रकाशातच बचावकार्य सुरू ठेवले आणि अधिकाधिक प्रवाशांची सुटका करण्याचे काम केले.

अपघातानंतर पंतप्रधान मोदी यांनीदेखील मृतांच्या नातेवाइकांप्रति संवेदना व्यक्त केली आहे. तसेच, अपघातग्रस्तांना सरकारतर्फे सर्वतोपरी मदत केली जात असल्याची माहिती त्यांनी दिली. पंतप्रधान मदतनिधीतून मृतांच्या नातेवाइकांना प्रत्येकी दोन लाख तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपयांची मदत जाहीर करण्यात आली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
215,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा