देशाचे नाव ‘भारत’ की ‘इंडिया’ यावर आरोपप्रत्यारोप सुरू असताना यापूर्वी अनेकदा केंद्र सरकारने इंडिया नावाच्या ऐवजी ‘भारत’ या नावाला प्राधान्य दिले आहे. यावरून राजकारणंही तापलं आहे. या दरम्यान, गुगल मॅपने देशाचे ‘भारत’ हे नाव स्वीकारले आहे. गुगल मॅपच्या सर्च बॉक्समध्ये ‘भारत’ असे लिहिल्यास तिकडे भारत हे नाव आणि त्यासोबतच तिरंगा ध्वज दिसत आहे. शिवाय असेही लिहिले आहे की, दक्षिण आशियातील एक देश.
गुगल मॅपने ‘भारत’ आणि ‘इंडिया’ या दोन्ही शब्दांना ‘दक्षिण आशियातील एक देश’ म्हणून मान्यता दिली आहे. त्यामुळे वापरकर्त्यांनी भारताचा अधिकृत नकाशा पाहण्यासाठी म्हणून गुगल मॅपवर भारत किंवा इंडिया लिहिल्यास त्यांना भारताचा नकाशा दिसून येईल. गुगल मॅपवर मराठी, हिंदी किंवा इंग्रजी कोणत्याही भाषेत ‘भारत’ लिहिल्यास भारताचा नकाशा दाखवला जात आहे. याबाबत गुगलकडून अद्याप कोणतंही अधिकृत वक्तव्य करण्यात आलेलं नाही.
हे ही वाचा:
देशासाठी घातक विचारसरणीला विरोध करण्यासाठी केले केरळमध्ये स्फोट
भारत अभेद्य, इंग्लंडला नमवून सलग सहावा विजय
रोहित, शार्दुलचे प्रशिक्षक दिनेश लाड यांचे ‘ते’ स्वप्न झाले पूर्ण
उपमुख्यमंत्री अजित पवारांना डेंग्यूची लागण!
भारत सरकारने G20 परिषदेच्या वेळी डिनर निमंत्रणात ‘प्रेसिडेंट ऑफ इंडिया’ ऐवजी ‘प्रेसिडेंट ऑफ भारत’ असे लिहिण्यात आले होते. त्यानंतर आता गुगलकडून हा बदल करण्यात आला आहे. पर्यायी नाव वापरण्यावरून देशात वाद निर्माण झाला होता. विरोधकांनी हा मुद्दा उचलून धरत गोंधळ घातला होता. काहींनी गृहीत धरले होते की, सरकार कदाचित देशाचे अधिकृत नाव बदलण्याचा प्रयत्न करत आहे. मात्र, अशी शक्यता केंद्र सरकारने नाकारली असून आत्तापर्यंत असा कोणताही बदल झालेला नाही. ‘इंडिया’ आणि ‘भारत’ ही दोन्ही देशासाठी संवैधानिकरित्या मान्यताप्राप्त नावे आहेत. भारतीय राज्यघटनेच्या कलम १ मध्ये म्हटल्याप्रमाणे, “इंडिया, म्हणजे भारत हा राज्यांचा संघ असेल.”